हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Digital Rupee : गेल्या काही महिन्यांपासून RBI डिजिटल रुपया लाँच करणार असल्याच्या बातम्या येत होत्या. आता त्यासाठी जास्त काळ वाट पाहावी लागणार नाही. कारण आता RBI कडून रिटेल डिजिटल रुपयाचा पहिला पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात आला आहे. दोन टप्प्यांत होणाऱ्या या प्रोजेक्टसाठी RBI कडून आठ बँकांची निवड केली गेली आहे. याची सुरुवात स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, येस बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँक या चार बँकांद्वारे होईल. त्यानंतर पहिल्या टप्प्यात इतर नऊ शहरांमध्येही त्याची खरेदी-विक्री करता येणार आहे.
आता डिजिटल रुपया लॉन्च केल्यानंतर स्वतःची ब्लॉकचेन करन्सी सुरू करणाऱ्या निवडक देशांच्या यादीत भारताचा देखील समावेश झाला आहे. हे लक्षात घ्या कि, अमेरिकेसारख्या देशाने अजूनही आपली सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) लाँच केलेली नाही. Digital Rupee
Digital Rupee कसा खरेदी करावा ???
या पायलट प्रोजेक्ट अंतर्गत, स्टेट बँक ऑफ इंडिया, ICICI बँक, येस बँक आणि IDFC फर्स्ट बँक सध्या भारतात डिजिटल रुपया जारी करतील. तसेच येत्या काळात बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक आणि कोटक महिंद्रा बँक या आणखी चार बँका लवकरच भारतात डिजिटल रुपया जारी करतील.
आता फक्त इथे उपलब्ध होणार Digital Rupee
हे लक्षात घ्या कि, सध्या Digital Rupee फक्त मुंबई, नवी दिल्ली, बेंगळुरू आणि भुवनेश्वरमध्येच उपलब्ध असेल. यानंतर येत्या काही दिवसांत तो अहमदाबाद, लखनौ, हैदराबाद, इंदूर, गंगटोक, गुवाहाटी, कोची, पाटणा आणि शिमला येथेही उपलब्ध होईल.
अशा प्रकारे खरेदी करा डिजिटल रुपया
जर आपल्याला डिजिटल रुपया खरेदी करायांचा असेल तर त्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, येस बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँकेचे ऍप किंवा वेबसाइटवरून खरेदी करता येईल. मात्र बँका ग्राहकांना त्यांच्या सध्याच्या ऍप्सवरून डिजिटल रूपये खरेदी करण्याची परवानगी देतील की फक्त डिजिटल रूपया हाताळण्यासाठी नवीन ऍप किंवा वेबसाइट जारी करतील याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही.
डिजिटल रुपया शेअर करता येईल का???
क्रिप्टोप्रमाणेच Digital Rupee देखील आपले मित्र किंवा कुटुंबासोबत शेअर केला जाऊ शकतो. मात्र हे फक्त त्या बँकांच्या ऍप्सद्वारेच करता येईल ज्यांना भारतात जारी करण्याचा परवाना देण्यात आला आहे. आता डिजिटल रुपया देखील वॉलेटमध्ये जमा करता येईल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.rbi.org.in/Scripts/BS_PressReleaseDisplay.aspx?prid=54773
हे पण वाचा :
IDFC First Bank कडून एफडीवर मिळणार 7% पेक्षा जास्त व्याज, अशा प्रकारे करा गुंतवणूक
PNB कडून कर्ज घेणे महागले, आता EMI देखील वाढणार
Bank Holiday : डिसेंबर महिन्यात 13 दिवस बँका राहणार बंद, बँकांच्या सुट्ट्यांची लिस्ट तपासा
Financial Changes : आजपासून बदलले ‘हे’ 5 नियम, याचा आपल्यावर कसा परिणाम होईल ते पहा
Train Cancelled : रेल्वेकडून आजही 236 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासा