RBI MPS Meeting | EMI कमी होणार का ? RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

RBI MPS Meeting | रिझर्व बँक ऑफ इंडिया ही नेहमीच वेगवेगळे बदल करत असते. अशातच आता आरबीआयच्या पतधोरण बैठकीचा आज म्हणजेच 9 ऑक्टोबर रोजी शेवटचा दिवस आहे. या वेळी आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. त्यांनी रेपोदराबाबत मोठा निर्णय घेतलेला आहे. यावेळी देखील त्यांनी रेपो दरात कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही. आरबीआयने फेब्रुवारी 2023 मध्ये शेवटचा रेपो दर बदलला होता. हे दर 0.25 टक्क्यांनी वाढून 6.5% केलेले होते. आणि हे तेव्हापासून रेपोदर स्थिर राहिलेला आहे.

रेपोदर म्हणजे काय | RBI MPS Meeting

जेव्हा तुम्ही तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बँकेकडून कर्ज घेता आणि व्याजासह त्याची परतफेड देखील करता येते. त्याचप्रमाणे सार्वजनिक खाजगी आणि व्यवसायिक क्षेत्रातील बँकांना देखील त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इतर बँकांकडून किंवा आरबीआयकडून कर्ज घेणे गरजेचे असते.

यावेळी रिझर्व बँक ऑफ इंडिया या बँकांना व्याजदराने कर्ज देते. आणि त्याला रेपो दर असे म्हणतात. रेपो दर कमी झाला की सर्वसामान्य जनतांना दिलासा मिळतो. तर रेपोज दर वाढला तर सर्वसामान्यांना आर्थिक भार वाढतो. रेपो दर वाढला की, बँकांना देखील जास्त व्याजदराने कर्ज मिळते आणि सर्वसामान्यांसाठी कर्ज महाग होते.

जीवा महागाई खूप जास्त असते. तेव्हा आरबीआय अर्थव्यवस्थेतील पैशांचा प्रवाह हा कमी करण्याचा प्रयत्न करते आणि रेपो दर वाढवते. सहसा रेपोदरामध्ये 0. 50 किंवा त्यापेक्षा कमी दराने वाढ केली जाते. परंतु जेव्हा अर्थव्यवस्था जास्त वाईट टप्प्यातून जाते. तेव्हा पुनर्प्राप्तीसाठी पैशांचा प्रवाह वाढवावा लागतो. अशावेळी आरबीआय ही रेपोदर कमी करते. आणि गरज नसेल तर तसा स्थिर ठेवते.

सध्या महागाईत देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आणि बाजारातील मालाची मागणी देखील कमी होत आहे. याचा समतोल राखण्यासाठी रिझर्व्ह बँक बैठक घेत असते. यावेळी आरबीआयच्या सहा सदस्य टीमने पॉलिसी रेट मधील बदलाबाबत मौद्रिक धोरण बैठकीद्वारे चर्चा केलेली आहे.