हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBI कडून आज रेपो दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. यावेळी 50 बेसिस पॉइंट्स (0.50 टक्के) वाढ झाली आहे. ज्यामुळे आता रेपो दर 4.90 टक्के इतका झाला आहे. बुधवारी RBI ने पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली. या वाढीमुळे आता सर्व प्रकारची कर्जे महागणार आहे. ज्यामुळे आता सर्वसामान्यांना जास्त EMI द्यावा लागणार आहे.
RBI ने आपल्या पॉलिसी रेपो रेट मध्ये 50 बेस पॉईंट्स म्हणजेच 4.90% ची वाढ केली आहे, तर कायम ठेव सुविधा (SDF) दर 4.15% वरून 4.65% आणि मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी (MSF) दर आणि बँक दर 4.65% वरून 5.15% वर एड्जस्ट केला गेला आहे. RBI च्या या निर्णयाचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून आला. सकाळच्या ओपनिंग गॅप-अपनंतर लगेचच बाजार घसरला.
गेल्याच महिन्यात RBI ने पॉलिसी रेपो रेटमध्ये 40 बेसिस पॉईंटने म्हणजेच 4.40% वाढ करून सर्वांनाच धक्का दिला होता तर कायम ठेव सुविधा (SDF) दर 4.15% आणि मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी (MSF) दर आणि बँका दर 4.65% वर एड्जस्ट केला गेला.
‘या’ वाढीचा कसा परिणाम होईल ते समजून घ्या…
रेपो दरात वाढ झाल्याने होम आणि ऑटो लोनसारख्या कर्जाच्या EMI मध्ये वाढ होईल.
रेपो दर वाढवल्याचा परिणाम बँकांचे बचत खाते आणि एफडीवरही होणार आहे. आता बँका बचत खाते आणि FD वरील व्याजदर वाढवू शकतात.
वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी RBI ने रेपो दरात वाढ केली आहे. या ताज्या दरवाढीमुळे महागाई नियंत्रणात येईल अशी अपेक्षा करता येईल.
या दरवाढीचा सर्वात मोठा परिणाम उद्योगांना होणार आहे, कारण त्यांच्यासाठीही लोन आणि व्याजदर आधीच्या तुलनेत आणखी वाढतील.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.rbi.org.in/
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित घसरण !!! नवीन भाव तपासा
Google Pay वर आता वापरता येणार Hinglish भाषा, कसे ते जाणून घ्या
BSNL च्या ‘या’ ब्रॉडबँड प्लॅनमध्ये 100 Mbps स्पीडसह मिळवा OTT बेनेफिट्स !!!
Aadhaar Update : आपल्या आधार कार्डशी किती सिम कार्ड लिंक्ड आहेत ??? अशा प्रकारे तपासा
PM Kisan: 11वा हप्ता चुकलेल्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर !!! सरकारने e-KYC ची मुदत वाढवली