हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Torn Notes : बऱ्याचदा लोकांकडे जुन्या किंवा फाटलेल्या नोटा येतात. बाजारात कोणताही दुकानदार अशा नोटा घेत नाही. यामुळे अनेकदा लोकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. मात्र, आपल्याला हे ठाऊक आहे का कि, अशा फाटलेल्या नोटा बँकांमध्ये सहजपणे बदलता येतात. मात्र याबाबतची माहिती नसल्यामुळे लोकं बँकांमध्ये जात नाहीत. तसेच खराब नोटा बँकेतून बदलून घेण्याबाबत RBI ची काही मार्गदर्शक तत्त्वे देखील आहेत. चला तर मग त्याविषयीची माहिती जाणून घेउयात…
आता आपल्या फाटलेल्या जुन्या नोटा बँकेतून सहजपणे बदलता येतील. RBI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एखाद्या बँकेने तसे करण्यास नकार दिल्यास, त्यांच्यावर कारवाई देखील होऊ शकते. तसेच बँकेने फाटलेल्या नोटा बदलून न घेतल्यास, ग्राहकांना त्याबाबत आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन तक्रारही करता येते. Torn Notes
फाटलेल्या नोटांबाबत RBI चे नियम
RBI च्या परिपत्रकानुसार, फाटलेल्या नोटा बदलून देण्यासाठी काही मर्यादा आहे. हे जाणून घ्या कि, कोणत्याही व्यक्तीला एका वेळी जास्तीत जास्त 20 नोटा बदलता येतील. मात्र त्याचे एकूण मूल्य 5,000 रुपयांपेक्षा जास्त नसावी. तसेच खूप जळालेल्या, जास्त फाटलेल्या तुकड्यांच्या नोटा बदलता येणार नाहीत. अशा नोटा फक्त RBI च्या इश्यू ऑफिसमध्ये जमा करता येतील. Torn Notes
नोट जितकी फाटली असेल तितकी तिची किंमत
आपल्याकडील फाटलेल्या नोटेची किंमत ही आपली नोट किती फाटली आहे यावर अवलंबून असेल. जर 2000 रुपयांची नोट 88 स्क्वेअर सेंटीमीटर असेल तर त्याची पूर्ण किंमत दिली जाईल. तसेच जर याचा फक्त 44 चौरस सेंटीमीटर भाग असेल तर अर्धी रक्कम दिली जाईल. त्याचप्रमाणे 200 रुपयांच्या फाटलेल्या नोटेचे 78 स्क्वेअर सेंटीमीटर भाग सुरक्षित असेल तर पूर्ण पैसे मिळतील, मात्र 39 स्क्वेअर सेंटीमीटर भागासाठी फक्त अर्धेच पैसे मिळतील. Torn Notes
RBI च्या म्हणण्यानुसार, जुन्या आणि फाटलेल्या नोटा सहजपणे बदलता येतात. यासाठी बँकेकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. मात्र, जर नोट जळाली असेल किंवा तिचे तुकडे झाले असतील तर अशा परिस्थितीत नोट बदलून दिली जाणार नाही. कारण जर बँकेच्या अधिकाऱ्याला नोट फाडल्याचे निदर्शनात आले तर ती नोट बँकेकडून स्वीकारली जाणार नाही. Torn Notes
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.rbi.org.in/commonperson/English/Scripts/Notification.aspx?Id=2652#:~:text=All%20other%20persons%20tendering%20mutilated,days%20of%20receipt%20of%20notes.
हे पण वाचा :
Tax Saving Tips : आपल्या गुंतवणुकीचे अशा प्रकारे नियोजन करून वाचवा टॅक्स
Adani Group ला आणखी एक झटका !!! सिटी बँकेनंतर आता ‘या’ बँकेने देखील कर्ज देण्यास नकार
Pre-Approved Loan म्हणजे काय ??? जाणून घ्या ते घेण्याचे फायदे
Earn Money : मोबाईलवरून फोटो काढून कमवता येतील पैसे, जाणून घ्या त्यासाठीची पद्धत
Activa Electric Scooter : आपल्या पेट्रोल अॅक्टिव्हाला अशा प्रकारे बदला इलेक्ट्रिकमध्ये, त्यासाठी किती खर्च येईल ते पहा