हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBI ने आपल्या पेमेंट सिस्टीममध्ये आकारल्या जाणार्या अनेक शुल्कांबाबत जनतेकडून फिडबॅक मागितला आहे. यासाठी आरबीआय कडून एक डिस्कशन पेपर देखील जारी करण्यात आला आहे. आरबीआयने पेमेंट सिस्टीममध्ये डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, NEFT, RTGS, UPI आणि PPI यांचा समावेश केला आहे. या विविध प्रकारच्या पेमेंट सिस्टीममध्ये आकारण्यात येणाऱ्या शुल्कांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आरबीआय जनतेकडून फिडबॅक मागवत आहे.
“पेमेंट सिस्टीम्समधील शुल्क” या विषयावरील डिस्कशन पेपर पब्लिक डोमेनमध्ये ठेवण्यात आला आहे. यामध्ये अशा प्रकारच्या शुल्कांबाबतच्या विविध पैलूंवर जवळपास 40 प्रश्न विचारण्यात आले आहेत. मात्र, आरबीआय ने याबाबत अद्याप कोणतेही मत दिलेले नाही. त्याऐवजी, आरबीआय ने 3 ऑक्टोबर 2022 पर्यंत कमेंट आणि प्रतिक्रिया देण्यास सांगितले आहे. ज्याचा उपयोग आगामी धोरणे ठरवण्यासाठी केला जाईल.
शुल्क कोणाकडून ठरवले गेले पाहिजे ???
डिजिटल पेमेंट शुल्क नियामकाकडून निर्धारित झाले पाहिजे की बाजाराने ते निर्धारित केले पाहिजेत ??? तसेच व्यवहाराच्या मूल्यावर शुल्क आकारले जावे की निश्चित रकमेच्या गुणोत्तरावर ??? यावर RBI ने फिडबॅक मागितला आहे.
सामान्य जनतेला आणखी अधिकार देण्याचा हेतू
लोकांकडून मत घेतल्यानंतर RBI पुढे काय करणार याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही. मात्र रिझर्व्ह बँकेच्या पेमेंट व्हिजन 2025 डॉक्युमेंट्समध्ये ग्राहकांना आणखी अधिकार देण्यावर भर देण्यात आला आहे. जनतेने जास्तीतजास्त डिजिटल पेमेंटचा वापर करावा असे सरकारला वाटते. त्यामुळे, ग्राहकांच्या शुल्कात मोठी वाढ होण्याची शक्यता नाही जर त्यांनी तसे केले तर ती बँका, फिनटेक इत्यादींना सहन करावे लागेल.
आपले मत रिझर्व्ह बँकेपर्यंत कसे पोहोचवणार ???
RBI ने ग्राहकांना आणि इतर भागधारकांना 3 ऑक्टोबरपर्यंत आपले मत मांडण्यास सांगितले आहे. जेणेकरून या मिळालेल्या सूचनांच्या आधारे अंतिम नियम बनवता येतील. रिझर्व्ह बँकेने चर्चेच्या पत्रकात स्पष्ट केले आहे की, कोणत्याही गोष्टीवर कोणतीही मर्यादा किंवा नियंत्रण लादण्याचा आपला हेतू नाही, मात्र येणाऱ्या सूचनांचा विचार करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल. आपला फीडबॅक [email protected] वर पाठवता येईल. इथे हे लक्षात ठेवा की, तुमच्या प्रत्येक सूचनेमागे ठोस कारण असले पाहिजे, जेणेकरून RBI प्रत्येक कोनातून त्याचा विचार करेल. जर सविस्तरपणे चर्चा पेपर पाहायचा असेल तर या लिंकवर क्लिक करून डाउनलोड करता येईल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.rbi.org.in/
हे पण वाचा :
Bank FD : ‘या’ मोठ्या बँकांनी वाढवले FD वरील व्याजदर !!!
PNB कडून ग्राहकांना 31 ऑगस्टपर्यंत KYC करण्याचे आवाहन अन्यथा बंद होईल खाते !!!
HDFC Bank ने देखील FD वरील व्याजदरात केली वाढ !!! नवीन दर तपासा
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!