हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Assembly Election) आम आदमी पक्षाला (Aam Aadmi Party) मोठा धक्का बसला आहे. भाजपने दिल्लीमध्ये विजयाचा झेंडा गाढत आपचा दारुण पराभव केला आहे. परंतु आपच्या पराभवाला नेमके कारण कोणते ठरले आहे? याबाबत राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे. खरे तर, लिकर घोटाळ्याचा जबर फटका आपला बसला आहे. या प्रकरणामुळेच अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला, तर त्यांच्या प्रमुख सहकाऱ्यांवर कारवाई झाली. त्यामुळे हे प्रकरण दिल्लीमध्ये चांगलेच चर्चेचा विषय राहिले.
दिल्लीतील कथित दारू घोटाळ्यामुळे ‘आप’ सरकारवर मोठे संकट कोसळले होते. माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह अनेक नेते तुरुंगात गेले. यासह अरविंद केजरीवाल यांनाही चौकशीला सामोरे जावे लागले आणि निवडणुकीच्या तोंडावरच त्यांच्याविरोधात खटला चालवण्याची परवानगी देण्यात आली. भाजपने हाच मुद्दा उचलून धरत आपच्या भ्रष्टाचारावर हल्लाबोल केला.
महत्वाचे म्हणजे, लिकर घोटाळ्यानंतर केजरीवाल यांनी पायउतार होत आतिषी यांना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, त्या प्रभावी नेतृत्व करू शकल्या नाहीत. यामध्ये आपने घराणेशाहीविरुद्ध भूमिका घेतली असली तरी मतदारांना विश्वास जिंकायला आतिषी अपयशी ठरल्या. या सगळ्या काळामध्ये भाजप आपवर टीका करत विविध योजनांची घोषणा करत होते.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने अत्यंत प्रभावी रणनीती आखली होती. भाजपने निवडणुकीच्या प्रचारासाठी थेट केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री यांना जनतेमध्ये उतरवले. तसेच, दिल्लीत वेगवेगळ्या भाषिक समुदायांसाठी खास सभा आयोजित केल्या. इतकेच नव्हे तर, मुस्लिम मतदारांमध्येही विश्वास निर्माण करण्यात भाजप यशस्वी ठरली. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीचा निकाल सरळ भाजपच्या बाजूने लागला आहे.