Ready Reckoner : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 2024 – 25 या आर्थिक वर्षासाठी वार्षिक बाजार मूल्य दरात म्हणजेच रेडी रेकनरच्या (Ready Reckoner) दरात वाढ न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे घर खरेदी करणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
प्रत्येक वर्षी एक एप्रिल रोजी रेडी रेकनर चे (Ready Reckoner) दर निश्चित केले जातात. त्याचप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील रेडी रेकनरचा दर निश्चित केला गेला असून रेडीरेकनरच्या दरामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे घर खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. रेडीरेकनरच्या दरामध्ये वाढ करू नये अशी मागणी सर्वसामान्य बांधकाम व्यवसायिकांच्या संघटनांकडूनही करण्यात येत होती. त्याला सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे त्यामुळे 2022 मध्ये लागू असलेले दर यंदाही कायम राहणार आहेत. दरम्यान यंदा रेडी रेकनरच्या दरात कोणतीही वाढ न करता राज्य सरकारला अपेक्षित महसूल मिळाला असल्याने पुढील वर्षासाठी देखील दरात कोणतेही वाढ करण्याची सूचना आणि नसल्याचं नोंदणी महानिरीक्षक सोनवणे यांनी स्पष्ट केले आहे.
करोना मुळे एक एप्रिल 2020 ऐवजी सप्टेंबर 2020 मध्ये रेडी रेकनर (Ready Reckoner) दरात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर 2021- 22 या आर्थिक वर्षामध्ये रेडी रेकनरचे दर जसे थे ठेवण्यात आले होते. मात्र कोरोनामुळे राज्याची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने 2022- 23 मध्ये राज्यात रेडीरेकनरच्या दरात सरासरी पाच टक्के वाढ करत नागरिकांना धक्का दिला होता. ग्रामीण भागातही ही वाढ सरासरी 6.96%, महानगरपालिकांच्या प्रभावक्षेत्रात 3.90%, नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रात 3.65% आणि महापालिका क्षेत्रात मुंबई वगळता 8.80% वाढ करण्यात आली होती. विशेष म्हणजे 2022 या वर्षांमध्ये राज्यात सर्वाधिक दरवाढ ही पुणे जिल्ह्यात करण्यात आली होती तसेच नागरी व प्रभावक्षेत्रात रेडी रेकनर पेक्षा जास्त किमतीने व्यवहार झालेल्या ठिकाणी वाढ तर रेडी रेकनर पेक्षा कमी किमतीने व्यवहार झालेल्या ठिकाणी दर कमी करण्यात आले होते. नव्याने विकसित होणाऱ्या भागात 25% वाढ केली होती.
काय आहेत सध्याचे दर (Ready Reckoner)
रेडी रेकनर चे दर हे ग्रामीण भागात सध्या 6.96%, महापालिका (Ready Reckoner) क्षेत्र नव्याने विकसित होणारा भाग 3.90%, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्र 3.62%, महापालिका क्षेत्र मुंबई वगळता 8.80% इतका आहे.
2011 ते 2025 पर्यंतचे दर
2011 पासून रेडीरेकनरच्या दराची जर तुलना केली तर 2010 – 11 ते 201७ पर्यंत सतत रेडीरेकनरच्या दरामध्ये वाढ करण्यात आली होती. त्यानंतर 2018 ते 2019 आणि 2019 ते 2020 या काळात रेडी रेकनरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेले नाही. मात्र 2020 ते 2021 मध्ये 1.74 टक्क्यांनी वाढ करण्यात आली. 2021- 22 ला वाढ करण्यात आलेली नाही. 2022- 23 ला पाच टक्के वाढ करण्यात आली. त्यापासून 2023 – 24 आणि 2024 -25 कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.