हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मानवाने अनेक प्रकारची तंत्रज्ञाने आत्मसात केली आहेत. हॉलिवूड चित्रपटात आपण काही कार स्टंट बघितले देखील असतील. असाच एका अनोख्या कारचा व्हिडीओ व्हायरल झाला असून लोक ही पाहून चक्रावून गेले आहेत. कारण यातील कार तुम्ही केवळ हॉलिवूडच्या सिनेमात पाहिली असेल, पण प्रत्यक्षात अशी कार तुम्ही कधीच पहिली नसेल. या व्हिडिओमध्ये कारचा समोरील भाग हा खोलला जाऊन स्टंट करताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हालाही कौतुक वाटेल असा हा व्हिडिओ आहे.
https://twitter.com/RexChapman/status/1344059878126596098?s=20
हा आश्चर्यकारक व्हिडीओ ट्विटर यूजर रेक्स चॅम्पमॅनने शेअर केला आहे. त्याने याच्या कॅप्शनला लिहिले आहे की, ‘गेट आउट’. या व्हिडीओला आतापर्यंत ५ लाख २१ हजारांपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर १७ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहे. शेकडो लोकांना यावर कमेंटही केल्या आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’