10 हजारांपेक्षा कमी किंमत असलेला Realme C33 भारतात लाँच, असे असतील फीचर्स

Realme C33
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल बाजारात अनेक नवनवीन स्मार्टफोन लाँच होत आहेत. आताही Realme या स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपनीकडून आपला Realme C33 2023 आवृत्ती भारतात लॉन्च करण्यात आली आहे. ज्यामध्ये मागील मॉडेलपेक्षा आणखी चांगले स्पेसिफिकेशन्सही देण्यात आले आहेत. Realme C33 हे जाणून घ्या कि, गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 6.5-इंच HD+ LCD डिस्प्ले आणि ऑक्टा-कोर Unisoc T612 प्रोसेसर सहीत हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला होता. चला तर मग या नवीन स्मार्टफोनच्या फीचर्सविषयीची माहिती जाणून घेउयात…

realme C33- realme (India)

Realme C33 च्या स्पेसिफिकेशन्सबाबत बोलायचे झाल्यास, यामध्ये 120Hz टच सॅम्पलिंग रेटसह 6.5-इंचाचा HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. ड्युअल सिम सपोर्ट असलेला हा फोन Android 12 आधारित Realme UI S Edition वर चालतो.

realme C33- realme (India)

कॅमेऱ्याबाबत बोलायचे झाल्यास, यामध्ये फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि AI सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी या फोनच्या समोरील बाजूस 5MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, यामध्ये 4G, 2.4GHz WiFi, Bluetooth 5.0, GPS, Glonass आणि Galileo सपोर्ट करण्यात आला आहे.

Realme C33 Launched In India With 5000mAh Battery, Dual Camera Setup: Price, Specifications And More

या नवीन Realme C33 मध्ये 4GB LPDDR4X रॅम, 128GB UFS 2.2 स्टोरेज आणि Mali G57 GPU सह ऑक्टा-कोर UniSoC T612 प्रोसेसर देण्यात आला आहे.तसेच यामध्ये 5,000mAh बॅटरी असेल जी 10W चार्जिंगला सपोर्ट करेल. तसेच या फोनमध्ये सिक्युरिटी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरही उपलब्ध असेल.

realme C33- realme (India)

हा फोन ब्लू, नाईट सी आणि सँडी गोल्ड कलर पर्यायांमध्ये उपलब्ध असेल आहे. या नवीन Realme C33 च्या 4GB + 64GB व्हेरिएंटसाठी 9,999 रुपये तर 4GB + 128GB व्हेरिएंटसाठी 10,499 रुपये किंमत ठेवण्यात आली आहे. ग्राहकांना हे स्मार्टफोन Realme Store वरून खरेदी करता यातील.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://buy.realme.com/in/goods/582

हे पण वाचा :
Bank Loan : अल्प मुदतीचे कर्ज घेण्याआधी त्यामधील ‘या’ 3 धोक्यांविषयीची माहिती जाणून घ्या
एकापेक्षा जास्त PF Account असतील तर अशा प्रकारे करा विलीन अन्यथा होऊ शकेल त्रास
Flipkart च्या बिग सेव्हिंग डेज सेलमधून सोनीचा 50 इंचाचा स्मार्ट टीव्ही स्वस्तात खरेदी करण्याची संधी
एकापेक्षा जास्त PF Account असतील तर अशा प्रकारे करा विलीन अन्यथा होऊ शकेल त्रास
Share Market मध्ये सलग पाचव्या दिवशी घसरण, सेन्सेक्स 344 अंकांनी तर निफ्टी 71.15 अंकांनी खाली