Realme C35 स्मार्टफोनवर मिळवा आतापर्यंतची सर्वात स्वस्त ऑफर, फीचर्स तपासा

Realme C35
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Realme C35 : आजकाल अनेक कंपन्यांकडून जबरदस्त स्मार्टफोन लाँच केले जात आहेत. ज्यामुळे लोकांना नवीन फोन खरेदी करण्यासाठी भरपूर पर्याय उपलब्ध झाले आहेत. अशातच ई-कॉमर्स वेबसाईट्सद्वारे स्मार्टफोन्सवर भरपूर ऑफर्स आणि डिस्काउंट देखील जातो आहे. ऑनलाईन शॉपिंग कंपनी असलेल्या फ्लिपकार्टकडूनही आपल्या प्लॅटफॉर्मवर अनेक चांगल्या ऑफर देखील दिल्या जात आहेत, ज्या अंतर्गत ग्राहकांना अतिशय कमी किंमतींत स्मार्टफोन खरेदी करता येत आहेत. आताही एका जबरदस्त ऑफर अंतर्गत, ग्राहकांना Realme C35 वर आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Đánh giá Realme C35 - Ưu điểm và nhược điểm

कॅमेऱ्याबाबत बोलायचे झाल्यास Realme C35 मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये LED फ्लॅश F/1.8 अपर्चरसहीत 50-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. यासोबतच F/2.4 अपर्चरसह 2 मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स आणि F/2.8 अपर्चरसहीत ब्लॅक अँड व्हाइट VGA सेन्सर आहे. तसेच या फोनच्या समोरील बाजूस 8-मेगापिक्सलचा AI प्रीमियम Sony सेंसरही देण्यात आला आहे. त्याचा अपर्चर साइज f/2.0 आहे.

Spesifikasi dan Harga Realme C35 di Indonesia - Tekno Liputan6.com

फोनची सर्वात खास बाब अशी कि यामध्ये 6.6 इंच FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 2408 x 1080 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 600 nits पीक ब्राइटनेसने सुसज्ज आहे. यासोबतच 90.7 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशो देखील उपलब्ध आहे. तसेच या स्मार्टफोनची स्क्रीन वॉटरड्रॉप नॉच शैलीतील एलसीडी पॅनेलवर तयार केली गेली आहे आणि ती 60 हर्ट्झ रिफ्रेश दराने काम करते.

Realme C35 | NoypiGeeks

Realme C35 हा स्मार्टफोन Android 11 OS वर चालतो. Realme UI 2.0 च्या संयोगाने कार्य करतो. तसेच या फोनमध्ये 2.0 GHz क्लॉक स्पीडसहीत ऑक्टा-कोर प्रोसेसर प्लब्ध आहे. त्याचप्रमाणे यामध्ये 12 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनवलेला Unisoc T616 चिपसेट देखील आहे. हा स्मार्टफोन LPDDR4X RAM आणि UFS 2.2 ROM तंत्रज्ञानाने सुसज्ज करून बाजारात लॉन्च करण्यात आला आहे.

Realme C35 review: Big features for a small price | T3

तसेच या Realme C35 मध्ये 5,000mAh पॉवरची बॅटरी आहे, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. या स्मार्टफोनची बॅटरी एका चार्जमध्ये पूर्ण दिवसाची बॅटरी लाइफ मिळेल. फ्लिपकार्टवर Realme C35 चा 4GB + 1238GB व्हेरिएंट असलेला स्मार्टफोन ग्राहकांना 13,999 रुपयांऐवजी फक्त 10,999 रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच SBI कार्डद्वारे त्यावर 10% चा इन्स्टंट डिस्काउंट देखील दिला जातो आहे.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.flipkart.com/realme-c35-glowing-black-64-gb/p/itmafb045222b2cf

हे पण वाचा :
Airtel ची भन्नाट ऑफर, ग्राहकांना मिळणार अनलिमिटेड 5G डेटा
Home Insurance द्वारे अशा प्रकारे मिळेल आपल्या घरातील नुकसानीची आर्थिक भरपाई
Bank FD : खुशखबर !!! ‘ही’ स्मॉल फायनान्स बँक एफडीवर देत आहे 9.50% व्याजदर
EPFO च्या ‘या’ योजनेअंतर्गत कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला मिळतील 7 लाख रुपये
New Business Idea : ‘या’ तंत्रज्ञानाद्वारे घराच्या छतावरच भाजीपाल्याची लागवड करून मिळवा लाखो रुपयांचे उत्पन्न