Realme C53 या दिवशी होणार लॉन्च;108MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी अन् बरंच काही

Realme C53
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Realme C53 : सध्या भारतीय बाजारात नवनवीन स्मार्टफोन लाँच होत आहे. जवळपास सर्वच कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी या फोनमध्ये उत्तम फीचर्स देत आहे. शानदार फीचर्स आणि मागणी जास्त असल्याने हे फोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. त्यातच आता  भारतीय बाजारात स्वस्तात मस्त मोबाईल फोन ग्राहकांना ऑफर करणारी मोबाईल कंपनी Realme ने पुन्हा एकदा बाजारात मोठा धमाका करणार आहे.

कंपनीने Realme C53 च्या भारतातील लॉन्चची तारीख जाहीर केली आहे. भारतात 19 जुलै रोजी दुपारी 12 वाजता हा फोन लॉन्च होईल. तसेच हा फोन भारतात फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. या फोनमध्ये ग्राहकांना तब्बल 108MP कॅमेरा आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे. चला मग जाणून घेऊया या भन्नाट स्मार्टफोनबद्दल संपूर्ण माहिती.

Realme C53 ची अंदाजे किंमत –

Realme C53 चे ग्लोबल व्हेरिएंट चॅम्पियन गोल्ड आणि मायटी ब्लॅकमध्ये आहे. मलेशियात डिव्हाइसची किंमत MYR 550 (अंदाजे रु. 9,800) आहे. भारतात हँडसेटची किंमत रु. 10,000 ते रु. 12,000 च्या दरम्यान असू शकते.

108 MP कॅमेरा –

Realme C53 इंडिया व्हेरियंटमध्ये 108MP प्राथमिक कॅमेरा असेल. तसेच हँडसेट 33W फास्ट चार्जिंगसह येईल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, C53 मध्ये 8MP कॅमेरा आहे. फोनवरील कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, 3.5 मिमी ऑडिओ जॅक, 4G, Wi-Fi 802.11 b/g/n/ac, Bluetooth v5.0 आणि USB Type-C पोर्ट समाविष्ट आहे.

Realme C53 चे Features-

डिव्हाइस मध्ये 6GB पर्यंत RAM आणि 128GB अंतर्गत स्टोरेज असू शकते. यामध्ये मायक्रोएसडी कार्ड सपोर्ट देखील आहे, ज्यामुळे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येईल. या मोबईलला 5,000mAh ची दमदार बॅटरी मिळते. ही बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते देते.  रियल मी च्या मोबईलची ही वैशिष्ट्ये पाहता बाजारात हा स्मार्टफोन चांगलाच धुमाकूळ घालणार हे मात्र नक्की..