8GB रॅमसह Realme ने लाँच केले 2 स्मार्टफोन; किंमतही अगदी परवडणारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Realme च्या मोबाईलला भारतीय बाजारात चांगली मागणी असते. इतर कंपन्यांपेक्षा Realme चे मोबाईल स्वस्त किमतीत उपलब्ध असल्याने सर्वसामान्य ग्राहकाला सुद्धा तो परवडतो. आताही कंपनीने भारतीय बाजारपेठेत Realme P1 5G सिरीज अंतर्गत २ स्मार्टफोन लाँच केले आहेत. Realme P1 5G आणि Realme P1 Pro 5G अशी या दोन्ही मोबाईलची नावे असून यामध्ये अनेक दमदार फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. आज आपण या दोन्ही स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन आणि किमतीबाबत जाणून घेऊयात….

Realme P1 5G-

Realme P1 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.67 इंचाचा फुल्ल HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 2,400 x 1,080 पिक्सेल रिझोल्यूशन, 240Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 2,000 nits पीक ब्राइटनेस मिळतो. खास बाब म्हणजे या मोबाईल मध्ये पॅनेल रेनवॉटर टच फिचर देण्यात आले आहे ज्यामुळे पावसांत किंवा ओल्या हातानी सुद्धा तुम्ही तो सहज हाताळू शकता. कंपनीने या मोबाईल मध्ये मीडियाटेक डाइमेंशन 7050 चिपसेट बसवली असून हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित Realme UI 5.0 वर काम करतों. मोबाईल मध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज देण्यात आलं आहे.

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Realme P1 5G मध्ये पाठीमागील बाजूला 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आहे. तर समोरील बाजूला 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आलाय. पॉवरसाठी स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 45W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करते. Realme P1 5G च्या 6GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये आहे तर 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 16,999 रुपये आहे. हा मोबाईल पीकॉक ग्रीन आणि फिनिक्स रेड कलरमध्ये उपलब्ध आहे.

Realme P1 Pro 5G-

Realme P1 Pro 5G मध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.7 इंचाचा फुल HD+ कर्व्ह OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 2,160Hz PWM डिमिंग रेट आणि 950 nits पीक ब्राइटनेस मिळतो. या मोबाईल मध्येही रेनवॉटर टच फीचर देण्यात आलं आहे. कंपनीने स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 6 Gen 1 SoC प्रोसेसर दिला असून हा रिअलमीचा हा मोबाईल 8GB रॅम आणि 256GB इनबिल्ट स्टोरेजसह येतो.

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Realme P1 Pro 5G च्या पाठीमागील बाजूला 50-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आलाय. या स्मार्टफोन मध्येही 5,000mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 45W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करते. Realme P1 Pro 5G च्या 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 19,999 रुपये आहे आणि 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 20,999 रुपये आहे. तुम्ही हा मोबाईलपॅरोट ब्लू आणि फिनिक्स रेड शेडमध्ये खरेदी करू शकता.