…. म्हणून राहुल गांधीनी थंडीतही फक्त टीशर्ट घातला; स्वतःच सांगितला ‘तो’ किस्सा

rahul gandhi t shirt
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेचा समारोप आज जम्मू काश्मीर येथील श्रीनगरमध्ये झाला. कन्याकुमारी पासून सुरूं झालेली ही पदयात्रा देशातील अनेक राज्यांमधून जात काश्मीर येथे थांबली. राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातुन तब्बल साडेतीन हजार किलोमीटर पायी प्रवास केला. यावेळी त्यांनी घातलेला तो टीशर्ट कायम चर्चेत राहिला. हिवाळ्याच्या दिवसात सर्वत्र कडाक्याची थंडी असूनही राहुल गांधींनी कोणताही स्वेटर न घालता फक्त टीशर्ट वरूनन देशाचा प्रवास का केला ? असा प्रश्न काँग्रेस कार्यकर्त्यांसह विरोधकांनाही पडला, मात्र त्याबाबत खुद्द राहुल गांधी यांनीच माहित देत यात्रेदरम्यानचा एक किस्सा सांगितला आहे.

जम्मू काश्मीर येथील श्रीनगर मध्ये आज भारत जोडो यात्रेचा समारोप पार पडला. यावेळी उपस्थित लोकांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, भारत जोडो यात्रेत चालत असताना थंडी वाढत होती. सकाळची वेळ होती. त्यावेळी चार लहान मुलं माझ्याकडे आली. तेव्हा त्यांच्या अंगावर कपडे नव्हते. मी त्यांच्यासमोर गुडघ्यावर बसलो आणि त्यांना मिठी मारली. तेव्हा मला कळल कि त्या मुलांना थंडी वाजत होती. तेव्हा मी विचार केला कि जर देशातील ही मुले स्वेटर घालत नसतील तर मी सुद्धा स्वेटर घालायला नको असं राहुल गांधींनी सांगितलं.

संपूर्ण यात्रेत राहुल गांधी फक्त त्या पांढऱ्या टीशर्ट वर आपल्याला पहायला मिळाले. खास करून जेव्हा भारत जोडो यात्रा उत्तरेकडे गेली तेव्हा तर थंडीचा काडाखा चांगलाच वाढला होता, मात्र अशा परिस्थिती सुद्धा राहुल गांधी यांनी स्वेटर न घातला टीशर्ट वरच आपली पदयात्रा सुरु ठेवली. भाजपच्या एका नेत्याने तर राहुल गांधींनी टी-शर्टच्या आतून गरम कपडे घातले होते, असा दावा केला होता. मात्र राहुल गांधी चालत राहिले आणि त्यांनी भारत जोडो यात्रा आज पूर्ण केली आहे.