एकनाथ शिंदे यांनी बंड का पुकारले? पहा ही 5 कारणे
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे नाराज असून सध्या 25 समर्थक आमदारांसोबत ते गुजरात मध्ये आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता असून ठाकरे सरकारही धोक्यात येऊ शकते. परंतु एकनाथ शिंदे यांनी बंड का पुकारला? हे जाणून घेऊया….
1) भाजपसोबत युतीचा शिंदेंचा आग्रह
2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत सत्तास्थापन करण्याचा शिंदे समर्थन आमदारांचा आग्रह होता. परंतु उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आघाडी केली. त्यामुळे अनेक शिवसेना आमदार नाराज झाले होते.
2) निधी वाटता वरून नाराजी
राज्यात महाविकास आघाडी असून शिवसेनेचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री पदावर आहेत. मात्र तरीही निधी वाटपात शिवसेना 3 नंबरला असल्याचे पाहायला मिळाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस ला सर्वाधिक निधी दिला जात असल्याने शिंदेसह शिवसेना आमदार नाराज होते.आमदारांनी वारंवार याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करूनही मुख्यमंत्र्यांनी दुर्लक्ष केले.
3) ईडी- सीबीआय ची शिवसेनेला भीती
राज्यात शिवसेनेनं काँग्रेस राष्ट्रवादी सोबत सरकार स्थापन केल्यानंतर शिवसेनेचे नेते सातत्याने ईडी च्या रडारा वर आले. प्रताप सरनाईक यांनी तर यावरून उद्धव ठाकरेंना पत्र लिहीत भाजपसोबत सरकार स्थापन करूया म्हणजे ईडी पासून तरी सुटका मिळेल अशी मागणी केली होती.
4) काँग्रेस- राष्ट्रवादी नकोच
एकनाथ शिंदे यांचा कायमच काँग्रेस राष्ट्रवादीला विरोध होता. राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही सत्ताकेंद्र शरद पवारांच्या हातात आहे अस म्हंटल जात. काँग्रेस राष्ट्रवादी मुळे शिवसेनेची स्थानिक पातळीवर अडचण होत आहे. शिंदे यांच्या बंडा मागे हेसुद्धा कारण असू शकते.
5) शिवसेनेतील स्थान कमी?
एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे 2 नंबरचे नेते म्हणून ओळखले जायचे. मात्र राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून शिंदेंना डावलले जात असल्याच्या चर्च्या सुरू होत्या. शिवसेना खासदार संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या नंतर शिंदेंचा नंबर गेला. त्यामुळे शिंदे नाराज असल्याची चर्चा होती.