जाणून घ्या डाळींब तडकण्याची कारणे 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। महाराष्ट्रातील काही भागातील विशेषतः कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांसाठी डाळींब पीक तसे वरदान ठरले आहे. मात्र या शेतीतही  मर रोग,  तेलकट डाग रोग, फळ तडकणे  यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. फळ तडकणे हे केवळ एकाच कारणामुळे न होता त्याची अनेक कारणे आहेत. पाण्याचे चुकीचे व्यवस्थापन, चुकीच्या जमिनीची निवड,  हमवामानातील बदल, तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव इत्यादी कारणांमुळे तसेच हलक्या जमिनीत नांगरटीच्या तासात रोपांची लागवड, जमिनीत मुक्त चुनखडीचे प्रमाण १२ टक्केपेक्षा जास्त असणे आणि हवेतील तापमान व आर्द्रतेत  रात्री व दिवसातील तापमानात तफावत अशा कारणांमुळे फळे तडकतात. अहमदनगर, सांगली, सोलापूर, आणि नाशिक भागातल्या डाळिंब बाग मोठ्या प्रमाणात घेतली जाते. दरम्यान या बागांवर तेलकट चट्टे आणि फळे तडकण्याचे विकार अधिक जाणवत असतात.

फळे तडकू नयेत किंवा डाळिंबला भेगा पडू नयेत यासाठी उपाय योजना केल्या जातात यामध्ये डाळिंबासाठी मध्यम, निचऱ्याची जमीन निवडणे, रोपांची लागवड ही  २ बाय २ बाय २ फुट लांबी रुंदी खोलीचे खड्डे घेऊन त्यामध्ये  माती  २ घमेले कुडलेले शेणखत  दीड  किलो सुपर फॉस्फेट ५० ग्रॅम फोरे यांचे मिश्रण करुन खड्डे भरुन रोपांची लागवड करणे, माती परीक्षणसाठी  प्रतिनिधिक स्वरुपाचा खड्डा घेऊन प्रत्येक एक फुटातील मातीचा पहिला थर, दुसरा  थर आणि तिसऱ्या फुटात माती असल्यास तिसरा थर अशा थराप्रमाणे माती घेऊन त्याचे प्रयोगशाळेत तपासणी करुन घेणे असे उपाय केले जातात.

यासोबतच डाळींब पिकाची लागवड करत असताना माती परीक्षण अहवालाप्रमाणे  सामू हा ६.५ ते ८.० पर्यंत असावा.  विद्युत वाहकता ही ०.५० डेसीसायमन प्रति मीटरपेक्षा कमी असावी तसेच मुक्त चुनखडीचे प्रमाण सर्व थरात १२ टक्क्यापेक्षा कमी असावे. माती परीक्षणावरुन डाळिंबास शिफारस केल्याप्रमाणे  पूर्ण वाढलेल्या झाडास शेणखत ४ ते ५ घमेले तसेच ६२५ ग्रॅम नत्र, २५० ग्रॅम स्फुरद आणि २५० ग्रॅम पालाश प्रति वर्ष प्रति झाडास ताण संपल्यानंतर पहिले पाणी देण्यापुर्वी द्यावे  व उर्वरितत नत्राची मात्रा दोन समान हप्त्यात विभागून द्यावी.पहिली मात्रा ताण संपल्यानंतर बेसल डोसच्या वेळी  व उर्वरित मात्रा बहारानंतर ४५  दिवसांननी आळे पद्धतीने  द्यावी. जमिनीत मुक्त चुनखडीचे  प्रमाण ५ टक्के पेक्षा  कमी असल्यास स्फुरद हे सिंगल सुपर फॉस्फेटद्वारे द्यावे, म्हणजे या खताद्वारे स्फुरदाव्यतिरिक्त कॅल्शियमचा पुरवठा झाडांना होतो तसेच मॅग्नेशिअम  सल्फेटचा वापर प्रति झाड २५ ग्रॅम प्रमाणे करावा. असे सुचविले जाते.

सुक्ष्म अन्न द्रव्ये  लोह, किंवा बोरॉनची कमतरता असल्यास सुक्ष्म अन्न द्रव्ये स्लरी द्वारे एकरी २०० लिटर पाण्यामध्ये २५ किलो ताजे शेण ५ लिटर गोमूत्र ५ किलो फेरस सल्फेट ५ किलो झिंक सल्फेट २ किलो बोरिक अॅसिड एकत्र आठवाडाभर सातव्या दिवशी झाडांना  स्लरी द्यावी. फुले  येण्यापुर्वी ५० टक्के फुले असताना झाडावर फुले मायक्रो ग्रेड -खख द्रवरुप सुक्ष्म अन्न द्रव्ये ग्रेडची  फरवाणी करावी. बागेत आच्छादनाचा वापर केल्यास तापमान व आद्रेतेवर नियंत्रण राहते. जमिनीच्या पोतानुसार पाण्याचे नियोजने करावे. ठिंबक सिंचनाद्वारे विद्राव्य खतांचा वापर करावा. पाण्याचा नियंत्रित वापर करावा, डाळिंबास जास्त  पाण्याचा वापर करु नये. तांबड्या, हलक्या जमिनीत कॅल्शिअमचे प्रमाण कमी असल्यास बोरॉनची फवारणी फुले आल्यावर व फळे लिंबाच्या आकाराची  असताना करावी.  फळांची फुगवण तसेच रंग चव चांगली  येण्यासाठी  फळ पक्कतेच्या  काळात पोटॅशिअम शोनाईट २ किलो २०० लिटर पाण्यातून ठिबक द्वारे  किंवा  फवारणीद्वारे १५ दिवसाच्या  अंतराने २ ते ३ वेळा द्यावे. या सर्व गोष्टी केल्यास डाळींब तडकण्याच्या समस्येपासून मुक्तता मिळू शकते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like