हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या सगळीकडे आयपीएल ची चर्चा असून कोरोना प्राधुर्भाव मुळे जगातील ही सर्वात लोकप्रिय स्पर्धा यूएई मध्ये चालू आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी मैदानात प्रेक्षकांना हजर राहण्याची परवानगी नाकारण्यात आलेली आहे. आपण टेलिव्हिजन जर आयपीएल सामना पाहत असाल तर सामन्या दरम्यान आपल्याला प्रेक्षकांचा गोंगाट ऐकू येत असेल…पण जर प्रेक्षकच नसतील तर हा आवाज कुठून आणि कसा येतोय याचा विचार आपल्या मनात नक्कीच आला असेल. हो हे शक्य आहे.
यासाठी एक उपाय काढण्यात आला तो म्हणजे प्रेक्षकांचे रेकॉर्डेड आवाज, टाळ्या-शिट्ट्या… आयपीएलच्या सामन्या दरम्यान असणारे प्रेक्षकांचे रेकॉर्डेड आवाज, टाळ्या-शिट्ट्या या मुंबईच्या स्टुडिओमध्ये तयार करण्यात आले आहेत. मुंबईच्या स्टुडिओमध्ये इंजिनिअरने तयार केलेल्या ‘साउंड बँक’ मुळे आपल्याला सामना पाहाताना प्रेक्षकांचे आवाज, टाळ्या-शिट्ट्या ऐकू येतात. यासाठी आयपीएल ब्रॉडकॉस्ट स्टार इंडियानं आयपीएलपूर्वीच तीन महिने तयारी केली आहे.
स्टार इंडियाचे क्रीडा प्रमुख संजोग गुप्ता यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितलेय की, ‘आयपीएल सुरु होण्यापूर्वी २०१८ पासून झालेल्या आयपीएलच्या १०० सामन्याचा अभ्यास केला. प्रत्येक सामन्यासाठी आणि खेळाडूसाठी आवाजाचा अभ्यास करण्यात आला. जसं की, चेन्नई आणि मुंबई यांच्या सामन्यातील आवाजाचा डेसीबल पंजाब आणि दिल्लीच्या सामन्यापेक्षा खूप वेगळा असेल. ‘
गुप्ता म्हणाले की, ‘ आम्ही प्रत्येक खेळाडू आणि संघासाठी वेगवेगळ्या आवजाची निवड केली. ज्यावेळी धोनी, रोहित शर्मा किंवा विराट कोहली षटकार मारतात तेव्हा नवख्या किंवा युवा खेळाडूपेक्षा चिअर करणारा आवाज वेगळा असेल. ज्यावेळी धोनी षटकार मारतो तेव्हा चेरॉक स्टेडिअममधील टाळ्यांचा आवाज असेल. विराट आणि रोहित शर्मासाठी खास आवाज असेल. एबी डिव्हिलिअर्ससाठी चिन्नास्वामी स्टेडिअमचा आवाज असेल. तर दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरसाठी कोटलामधून ‘श्रेयस-श्रेयस’ आवाज घुमेल. या सर्व आवाजांना स्टुडिओमध्येच डब करण्यात आलं आहे.’
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’