हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । कधी कधी झोपायच्या वेळी आपल्याला बरीच तहान लागते. तर कधी झोप लागली कि पाणी पिण्याची आठवण येते. रात्रीच्या वेळी पाणी पिण्यासाठी सारखे उठावे लागत असेल तर त्याची कारणे काय आहेत. अश्या कोणत्या आरोग्याच्या समस्या आहेत त्यामुळे आपल्याला रात्रीच्या वेळी पाणी पिण्यासाठी वारंवार उठावे लागते. ते जाणून घेऊया …
तहान कधी लागते ?
जर तुमच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण जर कमी झाले असेल तर तुम्हाला वारंवार तहान लागते. तहान लागण्याची प्रमाण हे ऋतूनुसार बदलत असते. थंडीच्या दिवसात अजिबात तहान लागत नाही. दिवसभरात जेवढे आपण पाणी पितो.तेवढ्या प्रमाणात आपण रात्रीच्या वेळी पाणी पीत नाही.
पण आपण जेवढे दिवसा पाणी पितो तेवढे तरी रात्री कधीच लागत नाही..
— हवेतला गारवा आणि आर्द्रता दोन्ही संतुलित असेल तर शरीरातील पाणी बाष्पीभवनाने उडून जात नाही. त्यामुळे रात्री तहान तहान होणे कमी होऊ शकते.
— सतत तहानलेले वाटणे किंवा पाणी पिण्याची इच्छा निर्माण होणे म्हणजे डिहायड्रेशन होणे..
— आपली जर तब्बेत व्यवथित नसेल तर उलट्या, जुलाब ह्या आजारांमुळे देखील शरीर डिहायड्रेट होते.
— रोज हेवी वर्कआऊट करत असाल, शारीरिक कष्टाची कामे असतील तर शरीरातील पाण्याची लेव्हल कमी होते.
— तरुण मुलानी तर कमीत कमी दिवसभरात १० ते १५ ग्लास पाणी पिणे आवश्यक असते.
— पाणी कमी झाले तर घशाला कोरड पडते, अंग गळून जाते, थकवा येतो आणि रात्रीची देखील खूप तहान लागते.
— जर आपल्या शरीरात मिठाचे प्रमाण जास्त असेल तर त्यावेळी सुद्धा रात्रीच्या वेळी तहान लागते.
— मद्याचा हँग ओव्हर असेल आणि शरीरातील सोडियमदेखील कमी झाले असेल तर सुद्धा रात्रीची तहान लागते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’