दिलासादायक: घाटीमध्ये साकारणार आणखीन तीन लिक्विड ऑक्सिजन प्रकल्प

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | कोरोना महामारीचा प्रादुर्भाव संपूर्ण देशभर दिसत आहे. यातच कोरोनाची दुसरी लाट आता आटोक्यात येत असून तिसऱ्या लाटेची चाहूल लागत आहे. कोरोनाचा तिसर्‍या लाटेत कोरोना डेल्टा प्लस व्हेरिएशन्सचा प्रभाव गंभीर असल्यामुळे आरोग्य यंत्रणा तयारीला लागली आहे. तिसर्‍या लाटेबद्दल प्रशासनाकडून आणि आरोग्य संघटनेकडून चिंता व्यक्त केली जात आहे. या तिसऱ्या लाटेचा प्रभाव लक्षात घेता तीन ऑक्सिजन प्रकल्पांसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

घाटी रुग्णालय प्रशासनाने प्रेशर स्विंग अँडसॉप्शर तंत्रज्ञान असलेला हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा 600 एमपीएल चा प्लांट बसवला आहे. आता परत एक हजार एमपीएल प्लांटसाठी उभारणी आणि वीजजोडणीची तयारी पूर्ण झाली आहे. सध्या 53 किलो लिटर लिक्विड ऑक्सिजन साठवता येईल अशी यंत्रणा घाटी प्रशासनाकडे आहे. परंतु दुसरा लाटेमध्ये उद्भवलेल्या त्रुटी पाहता आणखी ऑक्सिजनची गरज भासणार आहे. यामुळे जिल्हा प्रशासनामार्फत आणखी तीस किलोमीटर ऑक्‍सिजनचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. यामुळे लिक्विड ऑक्सिजन साठवून ठेवण्याची क्षमता 83 किलोलिटर होईल.

घाटीच्या आवारात मेडिसिन बिल्डिंग जवळ 10 किलोमीटरचा एक ऑक्सिजन प्रकल्प आहे, तिथे आणखी एक 10 किलोमीटर क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर नेफ्रोलॉजी आणि सव्हीटीएस, सर्जिकल विभाग याठिकाणी ही 10 किलोलिटर क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.