हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या नर्सिंग क्षेत्रात (Nursing Field) काम करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची ठरू शकते. कारण की, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS), दिल्लीने नर्सिंग ऑफिसर भरती सामान्य पात्रता परीक्षा (NORCET)-8 साठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 1794 पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवार 17 मार्च 2025 पर्यंत अर्ज करू शकतात.
महत्त्वाच्या तारखा आणि अर्ज प्रक्रिया
NORCET-8 साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 24 फेब्रुवारी 2025 पासून सुरू झाली आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 17 मार्च 2025 आहे. इच्छूक उमेदवारांना एम्सच्या अधिकृत वेबसाइट aiimsexams.ac.in वर जाऊन अर्ज भरावा लागेल.
कोणती पदे भरली जाणार
या भरतीत विविध एम्स आणि आरोग्य संस्थांमध्ये नर्सिंग ऑफिसर पदांसाठी जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी प्रमुख संस्थांमध्ये पदसंख्या खालीलप्रमाणे आहे.
- एम्स पटना – 308 पदे (यामध्ये दिव्यांग उमेदवारांसाठी 29, महिलांसाठी 24 आणि पुरुषांसाठी 5 जागा आरक्षित)
- CAPFIMS, मैदानगढ़ी – 300 पदे
- एम्स दिल्ली – 202 पदे
एकूण 23 संस्थांमध्ये NORCET-8 स्कोरच्या आधारावर भरती प्रक्रिया पार पडणार आहे.
शैक्षणिक पात्रता आणि इतर अटी
अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे भारतीय नर्सिंग परिषद (INC) किंवा राज्य नर्सिंग परिषदाद्वारे मान्यता प्राप्त संस्थेतून बीएससी (ऑनर्स) नर्सिंग, बीएससी नर्सिंग, किंवा जनरल नर्सिंग मिडवाइफरी (GNM) मध्ये डिप्लोमा असणे आवश्यक आहे. तसेच, बीएससी पोस्ट-सर्टिफिकेट किंवा पोस्ट-बेसिक बीएससी नर्सिंग डिग्री असलेल्या उमेदवारांनाही अर्ज करण्याची संधी आहे.
याशिवाय, अर्जदारांचे भारतीय नर्सिंग परिषद किंवा राज्य नर्सिंग परिषदेमध्ये नोंदणीकृत नर्स म्हणून रजिस्ट्रेशन असणे बंधनकारक आहे.
अर्ज शुल्क
सामान्य आणि ओबीसी वर्ग: 3000
SC/ST/EWS वर्ग: 2400
दिव्यांग उमेदवारांसाठी अर्ज शुल्क माफ
निवड प्रक्रिया
NORCET-8 साठी उमेदवारांची निवड दोन टप्प्यातील परीक्षांच्या आधारे केली जाणार आहे.
- प्राथमिक परीक्षा – 12 एप्रिल 2025 रोजी घेतली जाईल.
- मुख्य परीक्षा – 2 मे 2025 रोजी आयोजित केली जाईल.
अर्ज कसा करावा?
- एम्सच्या अधिकृत वेबसाइट (aiimsexams.ac.in) वर जा.
- “रिक्रूटमेंट” टॅबमधून “नर्सिंग ऑफिसर” विभाग निवडा.
- NORCET-8 लिंकवर क्लिक करून नवीन रजिस्ट्रेशन करा.
- आवश्यक माहिती भरून, दस्तऐवज अपलोड करा आणि शुल्क जमा करा.
- अर्ज सबमिट करून त्याची प्रिंट काढा.
- अधिक माहितीसाठी aiimsexams.ac.in या वेबसाईटला भेट द्या.