अग्नीपथ योजनेअंतर्गत महिलांना सुवर्णसंधी!! 1000+ जागांसाठी भरती; इथे करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुरुषानंतर आता महिलांनाही केंद्र सरकारच्या अग्निपथ योजने अंतर्गत देशसेवेची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली असून या योजनेअंतर्गत 1000 हुन अधिक जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून शेवटची तारीख 7 सप्टेंबर 2022 आहे.

नोकरी– सरकारी
योजना– अग्निपथ योजना
पदसंख्या– 1000+
नोकरीचे ठिकाण– महाराष्ट्र्र
अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख– 7 सप्टेंबर 2022

वयोमर्यादा-

कमीत कमी- 17.5 वर्ष
जास्तीत जास्त- 23 वर्ष

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

1. महिला उमेदवारांनी संबंधित पदांनुसार इयत्ता दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

2. उमेदवारांनी नोटिफिकेशनमध्ये देण्यात आलेल्या मार्काच्या स्कीमनुसार मार्क्स घेतले असणं आवश्यक आहे.

3. इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

4. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

5. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

आवश्यक शारीरिक पात्रता

1. उंची 162 से.मी. असावी

2. वजन उंचीनुसार समतोल साधणारेआवश्यक आहे.

3. भारतीय सैन्याच्या स्टैंडर्डनुसार वजन आणि उंची असणं आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया कशी असेल-

1. शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि शारीरिक मापन चाचणी (पीईटी आणि पीएमटी)

2. लेखी परीक्षा

3. डॉक्युमेंट पडताळणी

4. वैद्यकीय तपासणी

मिळणारे वेतन

1. पहिले वर्ष रु.30,000/- दरमहा
2. दुसरे वर्ष रु.33,000/- प्रति महिना
3. 3रे वर्ष रु. 36,500/- प्रति महिना
4. चौथे वर्ष रु. 40,000/- प्रति महिना
5. 4 वर्षानंतर बाहेर पडल्यानंतर सेवा निधी पॅकेज दिले जाईल.

आवश्यक कागदपत्रे-

Resume
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्र
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो – 20 कॉपी

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx] येथे क्लिक करा.