TCS मध्ये 3,000 हून अधिक रिक्त पदांसाठी भरती; वॉक-इन ड्राईव्हद्वारे होणार उमेदवारांची निवड

0
23
TCS
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| भारताच्या आघाडीच्या आयटी सेवा प्रदाता कंपन्यांपैकी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) एक आहे. या कंपनीने आता देशभरात मोठ्या प्रमाणावर भरती मोहीम सुरू केली आहे. सध्या आयटी आणि नॉन-आयटी क्षेत्रातील सुमारे 3,000 पदांसाठी ही भरती केली जात आहे. त्यामुळे विविध कौशल्ये आणि अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी ही मोठी सुवर्णसंधी ठरत आहे.

TCS वॉक-इन ड्राईव्ह

TCS ने 1 मार्च 2025 रोजी भारतातील विविध शहरांमध्ये वॉक-इन भरती ड्राईव्ह आयोजित केला आहे. महत्वाचे म्हणजे, 3 ते 12 वर्षांचा अनुभव असलेल्या तांत्रिक व्यावसायिकांसाठी ही संधी उपयुक्त ठरणार आहे.

प्रमुख पदे आणि भरती ठिकाणे

Salesforce LWC Developer – गांधीनगर, पुणे

AWS Node.js Developer – इंदूर

SAP Finance Control Consultant – चेन्नई

SAP Basis Consultant – गांधीनगर

SAP Materials Management Consultant (SAP MM) – अहमदाबाद

Oracle EBS SCM Consultant – पुणे

या पदांसाठी उमेदवारांकडे आवश्यक तांत्रिक कौशल्ये आणि संबंधित क्षेत्रातील अनुभव असणे गरजेचे आहे.

भरती प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे

iBegin पोर्टलवर भरलेला अर्ज

सरकारी ओळखपत्र (PAN/Aadhaar)

अपडेटेड रिझ्युमे

2 पासपोर्ट-साईज फोटो

दरम्यान, TCS ही 56 वर्षांहून अधिक अनुभव असलेली जगातील अग्रगण्य IT सेवा, कन्सल्टिंग आणि बिझनेस सोल्यूशन्स कंपनी आहे. Tata Group चा भाग असलेल्या या कंपनीत सध्या 607,354 हून अधिक कर्मचारी कार्यरत असून, ती 55 देशांमध्ये आपली सेवा पुरवते.

TCS मध्ये नोकरीसाठी कसा अर्ज करावा?

इच्छुक उमेदवारांनी TCS च्या अधिकृत LinkedIn पेजवर जाऊन योग्य पदांसाठी अर्ज करावा. तसेच, iBegin पोर्टलवर प्रोफाइल अपडेट करून भरती प्रक्रियेत सहभागी होता येईल.
नवीन संधी शोधणाऱ्या तांत्रिक व्यावसायिकांसाठी TCS ची भरती चालून आलेली सुवर्णसंधी ठरू शकते.