Mhada Lottery 2024 : मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये घर घेणं म्हणजे तारेवरची मोठी कसरतच म्हणावी लागेल. त्यातही जर मध्यमवर्गीय कुटुंब असेल तर मुंबईमध्ये हक्काचं घर घेताना नाकी नऊ नक्की येणार. मात्र मध्यमवर्गीयांच्या हक्काच्या घराचे स्वप्न म्हाडा कडून पूर्ण केलं जातं. मुंबईचा वाढता व्याप आणि वाढता विस्तार पाहता आता मुख्य मुंबई शहरापासून उपनगरांमध्ये नवनवे गृह प्रकल्प उभे राहत आहेत. म्हाडाच्या एका नव्या योजनेअंतर्गत काळाचौकी येथील अभ्युदय नगर वसाहतीचा पुनर्विकास करण्याच्या महाडाच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता मिळाली आहे. त्यामुळे अनेकांचे मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार म्हाडाकडून अभ्युदय नगर, आदर्श नगर आणि वांद्रे कॉलनी च्या पुनर्विकासासाठीचा (Mhada Lottery 2024) प्रस्ताव सादर केला होता ज्यामधून काळाचौकीतील प्रस्तावाला सध्या मान्यता मिळाली असून उर्वरित दोन वसाहतींच्या प्रस्तावासाठीची मान्यता अद्यापही प्रतीक्षेत आहेत.
2BHK फ्लॅट उपलब्ध होणार
साधारण 33 एकर भूखंडावर उभ्या असलेल्या काळाचौकीतील प्रकल्पावर सध्या पाहायला गेलं तर 49 इमारती आहेत. तर येथील लोकसंख्या 3350 इतकी असल्याची माहिती म्हाडा कडून देण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या पुनर्विकासातून म्हाडाला (Mhada Lottery 2024) दहा हजारांहून अधिक घरे उपलब्ध होणार आहेत. ज्यामुळे मुंबईत मोक्याच्या ठिकाणी घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न साकार होणार आहे. सगळ्या सोयी सुविधा या भागापासून जवळच आहेत आणि या ठिकाणी टू बीएचके घर म्हाडा कडून उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
दरम्यान या भागांमध्ये पुनर्विकास होण्यापूर्वी विकासाकांकडून रहिवाशांना पर्यायी भाडं आणि कॉपर्स फंड देणे बंधनकारक केला आहे. याशिवाय हा गृहप्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण होण्यासाठी त्यावर गृहनिर्माण (Mhada Lottery 2024) विभागातील अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीचे लक्ष असेल.
अभ्युदय नगर वांद्रे रिक्लेमेशन आणि वरळीतील आदर्श नगर या दोन्ही प्रकल्पांनाही राज्य शासनाचे मंजुरी मिळाली तर म्हाडाच्यावतीने (Mhada Lottery 2024) या पुनर्विकास प्रकल्पातून सुमारे 33 हजार घर विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतात.