हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Redmi A1 : सध्या बाजारात अनेक आकर्षक स्मार्टफोन लाँच केले जात आहेत. प्रत्येक कंपनी आपल्या स्मार्टफोनमध्ये जास्तीत जास्त फीचर्स देण्याचा प्रयत्न करत आहे. जर आपल्यालाही कमी किंमतीत चांगला फोन घ्यायचा असेल तर Redmi A1 हा फोन आपल्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकेल. चला तर मग आज आपण फोनच्या फीचर्सबाबत जाणून घेउयात…
या Redmi A1 मध्ये MediaTek Helio A22 प्रोसेसर देण्यात आलेला आहे, जो LPDDR4X रॅमसहीत येतो. यासोबतच मल्टी टास्किंगची सुविधा देखील आहे. त्याच्या स्क्रीनला 88.89% स्क्रीन टू रेशो मिळतो आणि 400 निट्स डिस्प्ले ब्राइटनेस मिळतो. यामध्ये Redmi A1 32GB स्टोरेज मिळेल. त्याचबरोबर त्याचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे 512GB पर्यंत वाढवता येईल.
कॅमेऱ्याबाबत बोलायचे झाल्यास या फोनमध्ये 8-मेगापिक्सलचा ड्युअल एआय कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी फोनच्या पुढच्या बाजूस 5 मेगापिक्सेलचा कॅमेरा देखील उपलब्ध आहे. याशिवाय, Redmi A1 मध्ये 20 हून जास्त भारतीय भाषांना सपोर्ट मिळेल.
या Redmi A1 मध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 10W चार्जरसहीत येईल. या फोनमध्ये OTG सपोर्ट देखील मिळेल. या फोनमध्ये 30 दिवसांचा स्टँडबाय टाइम, 17 तासांचा म्युझिक प्लेबॅक आणि 30 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक टाइम मिळत असल्याचा दावाही करण्यात आला आहे.
या Redmi A1 मध्ये 6.52 इंच HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच हा फोन लेदर फिनिश डिझाइनसहीत येईल. याद्वारे युझर्सला चांगली पकड, स्टायलिश लुक मिळेल. Android 13 वर काम करणाऱ्या या फोनमध्ये डार्क मोड आणि नाईट लाइट मोड देखील देण्यात आले आहेत.
आता ग्राहकांना Redmi A1 हा फोन 8,999 रुपयांऐवजी फक्त 6,499 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. या फोनवर ग्राहकांना 2,500 रुपयांची सूटही दिली जाते आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.mi.com/in/product/redmi-a1/
हे पण वाचा :
FD Rates : देशातील 4 मोठ्या बँकांपैकी कोणत्या बँकेच्या FD वर सर्वोधिक व्याज मिळेल ते पहा
LIC कडून दोन लाईफ इन्शुरन्स प्लॅन बंद, आता आपल्या पैशांचे काय होणार ते जाणून घ्या
Train Cancelled : रेल्वेकडून 154 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात आज मोठा बदल, पहा आजचे नवीन दर
Best Battery Backup Smartphone : दीर्घकाळ बॅटरी बॅकअप देणारे ‘हे’ 5 स्मार्टफोन, तपासा किंमत अन् फीचर्स