Hero Vida V1 : Hero MotoCorp ने लॉन्च केली पहिली इलेक्ट्रिक स्कुटर; पहा किंमत आणि वैशिष्ठ्ये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या बाजारात इलेक्ट्रिक (Hero Vida V1) वाहनांची चलती आहे. एक से बढकर एक इलेक्ट्रिक वाहनं आता मार्केटमध्ये येतायत. त्याच पार्श्वभूमीवर Hero MotoCorp ने आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर Vida V1 लाँच केली आहे . Vida V1 इलेक्ट्रिक स्कूटर V1 Plus आणि V1 Pro या दोन प्रकारांमध्ये लॉन्च केली आहे. आपल्या आपल्या बाईक रिव्हिव्ह मध्ये जाणून घेऊया या गाडीचे खास वैशिष्ट्ये आणि किमतीबाबत …

80kmph टॉप स्पीड –

Hero MotoCorp आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक (Hero Vida V1) स्कूटरमध्ये उत्तम रेंज ऑफर करत आहे. Vida V1 Pro एका चार्जवर 165 किमी धावू शकते. ही इलेकट्रीक बाईक फक्त 3.2 सेकंदात 0 ते 40 किलोमीटर प्रति तासाचा वेग पकडण्यास सक्षम आहे. तर दुसरीकडे, Vida V1 Plus एका चार्जवर 143 किमी रेंज देऊ शकते. ही गाडी 3.4 सेकंदात 0 ते 40 किमी प्रतितास वेग वाढवू शकतो. दोन्ही गाड्यांचे टॉप स्पीड 80kmph असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Hero Vida V1

वैशिष्ट्ये – (Hero Vida V1)

या इलेकट्रीक बाईकच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, Vida V1 मध्ये LED इल्युमिनेशन, सात-इंचाचा TFT टचस्क्रीन डिस्प्ले, राइड मोड्स (इको, राइड, स्पोर्ट आणि कस्टम) क्रूझ कंट्रोल, टू-वे थ्रॉटल, कीलेस कंट्रोल आणि स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी यांचा समावेश आहे. यात स्प्लिट सीट सेटअप, टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स, सिंगल रिअर शॉक आणि सिंगल डिस्क ब्रेक सेटअप आहे.

Hero Vida V1

किंमत –

गाडीच्या किमतीबाबत बोलायचं झाल्यास, Hero VIDA V1 Plus ची किंमत 1,45,000 रुपये आणि Hero VIDA V1 Pro ची किंमत 1,59,000 रुपये निश्चित करण्यात आली आहे. ग्राहक फक्त 2499 रुपये टोकन मनी देऊन ही इलेक्ट्रिक स्कूटर बुक करू शकतात.

Hero Vida V1 : इलेक्ट्रिक स्कुटरच्या मार्केटमध्ये आता हिरोची हवा; किंमत अन् फिचर्स जाणुन घ्या

हे पण वाचा :
Electric Scooter : 2 स्वस्त इलेक्ट्रिक स्कुटर लॉन्च; 47 हजारांपासून सुरू होते किंमत
Zontes 350R : भारतात लॉन्च झाली Zontes 350R स्ट्रीटफायटर बाईक; पहा किंमत आणि वैशिष्ट्ये
Flying Bike : अबब!! हवेत उडणारी बाईक; 100 किमी प्रतितास वेग
Kawasaki Z900 : Kawasaki ने लॉन्च केली नवी Bike; पहा किंमत आणि फीचर्स