हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Ration Card हे अनेक महत्वाच्या डॉक्युमेंट्सपैकी एक आहे. अनेक सरकारी कामांसाठी रेशनकार्ड लागते. तसेच त्यामध्ये नाव असणेही खूप महत्त्वाचे आहे. याद्वारे गरिबांना फ्री रेशनचा लाभ दिला जातो. याशिवाय आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्येही रजिस्ट्रेशन करण्यासाठी रेशनकार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे आपले रेशनकार्ड नेहमी अपडेट ठेवायला हवे. तसेच आपल्या घरातील सर्व सदस्यांची नावे देखील त्यामध्ये नोंदवायला हवीत.
घरात नुकतेच जन्मलेले एखादे बाळ असो किंवा लग्न करून घरी आलेली पत्नी असो त्यांचे देखील नाव रेशनकार्डवर नोंदवले जावे. तसे पहिले तर रेशनकार्डमध्ये नाव नोंदवणे हे काही अवघड काम नाही. आता अनेक राज्यांकडून ही सेवा ऑनलाइनही देण्यास सुरुवात झाली आहे. चला तर मग Ration Cardमध्ये नवीन सदस्याचे नाव कसे नोंदवता येईल हे जाणून घेउयात…
जर आपल्याला Ration Card मध्ये आपल्या पाल्याचे नाव जोडायचे असेल तर त्यासाठी कुटुंबप्रमुखाचे रेशनकार्ड, मुलाच्या जन्माचा दाखला आणि मुलाच्या पालकांचे आधार कार्ड लागेल. रेशनकार्डमध्ये नाव नोंदवण्यासाठी दिलेल्या फॉर्मसोबत ही कागदपत्रे द्यावी लागतील. तसेच जर घरातील नवीन सूनेचे नाव रेशनकार्डमध्ये नोंदवायचे असेल तर यासाठी लग्न केल्याचा पुरावा, पतीचे रेशनकार्ड, सुनेच्या माहेरच्या रेशनकार्डमधून नाव वगळल्याचे प्रमाणपत्र आणि माहेरमध्ये बनवलेले आधार कार्ड, फॉर्मसोबत जोडावे लागेल.
Ration Card मध्ये नवीन सदस्याचे नाव टाकण्यासाठी अन्न पुरवठा विभागाच्या ऑफिसमध्ये जाऊन फॉर्म घ्यावा लागेल. आता नवीन नावाची नोंदणी करण्यासाठी फॉर्ममध्ये सर्व माहिती योग्यरित्या भरा. त्यासोबत आवश्यक असलेली कागदपत्रे जोडा आणि अन्न पुरवठा केंद्रात जमा करा. त्याची पावती घ्यायला विसरू नका. यानंतर तेथील अधिकारी हा फॉर्म तपासतील आणि कागदपत्रांच्या व्हेरिफिकेशननंतर नवीन अपडेटेड रेशन कार्ड दिले जाईल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : http://State: Maharashtra – NFSA
हे पण वाचा :
RBI ने महागाई नियंत्रणात आणण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या ‘हे’ जाणून घ्या
RBI कडून रेपो दरात पुन्हा वाढ, आता EMI साठी द्यावे लागणार जास्त पैसे
Google Pay वर आता वापरता येणार Hinglish भाषा, कसे ते जाणून घ्या
OTT प्लॅटफॉर्म आणि चित्रपटगृहांबाबत Abhishek Bachchan चे मोठे विधान, अनेक गोष्टींचा केला खुलासा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित घसरण !!! नवीन भाव तपासा