कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने सन 2020-21 या आर्थिक वर्षात दि. 31 मार्च अखेर जी.एस.टी कर प्रणाली नियमित भरणा करून तत्पर कार्यवाही केल्याबद्दल भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाचे केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाने कारखान्याला ‘सर्टिफिकेट ऑफ ॲप्रीसिएशन प्रमाणपत्र’ प्रदान करून सन्मान केला आहे.
चेअरमन डॉ.सुरेश भोसले यांच्या कुशल नेतृत्वाखाली कृष्णा कारखान्याकडून जी.एस.टी कराचा नियमित भरणा केला जातो. केंद्रिय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाचे चेअरमन एम.अजितकुमार यांनी हे प्रमाणपत्र प्रदान केले असल्याची माहिती कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी यांनी दिली. केंद्र शासनाने जुलै २०१७ जी.एस.टी कर प्रणाली लागू केली. तेंव्हापासून ते ३१ मार्च २०२१ पर्यंत यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने अत्यंत तत्परतेने व नियमितपणे जी.एस.टी रक्कम तसेच विवरण पत्रके वेळेत भरणा करून केंद्र शासनास सहकार्य केले आहे.
त्याबद्दल भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाचे केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाने कारखान्याला ‘सर्टिफिकेट ऑफ ॲप्रीसिएशन प्रमाणपत्र’ प्रदान करून सन्मान केला आहे. नियमितपणे जी.एस.टी भरणा करण्याकामी जी.एस.टी. कन्सल्टंट जी.एस.थोरात, ॲड.व्ही.बी.गायकवाड, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, फायनान्स मॅनेजर सी.एन. मिसाळ व कारखान्याच्या जी.एस.टी विभागाने विशेष परिश्रम घेतले.
राज्य शासनाकडूनही अभिनंदन
सन २०१९-२० या आर्थिक वर्षात कृष्णा कारखान्याने राज्य शासनाकडे व्हॅट करापोटी ७७ कोटी १६ लाख रूपये आणि जीएसटी पोटी ९ कोटी ५ लाख असा एकूण ८६ कोटी २१ लाख रूपयांचा भरणा केला आहे. सातारा जिल्ह्यात इतक्या मोठ्या रकमेचा महसूल कर कृष्णा कारखान्याने शासनाकडे भरल्याबद्दल वस्तू व सेवाकर विभागाने कृष्णा कारखान्याचे विशेष अभिनंदन केले होते.