लव्हगुरु | पती-पत्नीच्या नात्यात सर्वात महत्त्वाचा असतो तो विश्वास. विश्वास असेल तर दोघांचेही नाते शेवटपर्यंत टिकून राहते. परंतु, याच विश्वासाची जागा जर संशयाने घेतली तर पती-पत्नीचे नाते खराब व्हायला आणि तुटायला फार वेळ लागत नाही. काही वेळा तर अगदीच क्षुल्लक कारणांवरून पती-पत्नीच्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. त्यामुळे बऱ्याच वेळा पती आपल्या पत्नीवर संशय घेत असतात. ती कारणे कोणती आहेत जाणून घ्या…
१. आपसातील संवादाची कमतरता – पत्नी जर पतिशी कमी बोलत असेल आणि इतरांशी छान गप्पा मारत असेल, तर या कारणामुळे पतीच्या मनात संशय निर्माण होऊ शकतो. पुरुष कधीच आपल्या मनातील गोष्टी व्यक्त करत नाहीत. मनात गोष्टी साठवत असतात. त्यामुळे संशयाला पाझर फुटतो. हे टाळण्यासाठी पतिने मनातील गोष्टी मनातच न ठेवता पत्नीजवळ मनमोकळेपणाने संवाद साधायला हवा. यातून आपसातील संबंध सुधारून नाते आणखी मजबूत होण्यास मदत होते.
२. पत्नीचा सतत मोबाईलचा वापर – पत्नी जर सतत मोबाईलचा वापर करत असेल किंवा अॅक्टिव्ह राहत असेल तर तिच्या पतीच्या मनात संशय आल्याशिवाय राहत नाही. मग ती मोबाईवर एखादा गेमही खेळत असेल तरी पतीच्या मनात वेगळ्याच संशयाने घर केलेले असते. त्यामुळे नाते टिकवून ठेवण्यासाठी पत्नीचे शक्यतोवर मोबाईलचा वापर कमीच करावा.
३. पत्नीचा घराबाहेर अधिकचा वावर – पत्नी जर पतीला न विचारता तिच्या मित्र परिवारासोबत अनेकवेळा फिरायला जात असेल तर पतीच्या मनात संशय निर्माण होवू शकतो. पत्नीच्या सततच्या सहली, नाईटऑऊट्स यामुळे पतीच्या मनातील संशय वाढू शकतो.
४. सतत श्रृंगार करणे – अनेक स्त्रियांना सुंदर दिसण्याची आवड असते, त्यामुळे त्या नेहमी शृंगारच करत असतात. परंतु, काही वेळा या गोष्टीचा अतिरेक करणे पती-पत्नीच्या नात्याकरिता महागात पडू शकते. सतत मेकअप करण्याची सवयही पतीला पत्नीवर संशय घेण्यास पुरेशी ठरते.
५. अनोळखी पुरुषाशी साधलेला संवाद – पत्नीने अनोळखी पुरुषाशी बराच काळ साधलेला संवादही पतीच्या मनात संशय निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकतो. अशा संवादातून पुढे पत्नीचे त्या अनोळखी पुरुषाशी अनैतिक संबंध निर्माण होतील असा विचारही पतीच्या मनात या संशयातून निर्माण होवू शकतो.
इतर महत्वाचे –
कामसूत्रानुसार या गोष्टी करणाऱ्या पुरुषांकडे स्त्रिया सर्वाधिक आकर्षित होतात
म्हणून सुंदर पत्नी असूनही पती देतात धोका..
इंटरनेटवर मुली सर्वाधिक काय सर्च करतात ? वाचून तुम्हालाही धक्का बसेल