औरंगाबाद : तीन ते चार वर्षाच्या दिव्यांग बालकाला घाटी परिसरात सोडून नातेवाईकांनी पळ काढल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. चौकशी केल्यानंतर बालकाचा एकही नातेवाईक पुढे आला नाही. या बालकाला घाटीच्या वॉर्ड क्रमांक 25 मध्ये दाखल करण्यात आले असल्याची माहिती घाटीचे अधिष्ठाता डॉक्टर कानन येळीकर यांनी दिली. याप्रकरणी घाटीचे सरफराज आणि सुरक्षारक्षक सरफराज यांनी बेगमपुरा पोलिस ठाण्यात नोंदवली आहे.
एक डिव्यांग मुलगा दुपारी उन्हात तोंडाला रुमाल बांधून बसलेला होता. बराच वेळ होऊनही त्याचे पालक दिसत नसल्याने स्थानिकांनी त्याला बोलण्याचा प्रयत्न केला. पण तो बोलू शकला नाही. त्यामुळे सुरक्षा रक्षकाने बेगमपुरा पोलिसांना माहिती दिली.
उपनिरीक्षक ज्योती गात आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ घाटीत धाव घेतली. तो जेव्हा दोन्ही पायांनी अपंग असून त्याला एक डोळाही नाही. त्याला बोलता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्याचे काम सुरु होते. या बालकाला कोणी ओळखत असल्यास त्यांनी बेगमपुरा पोलिसांशी संपर्क साधावा असे पोलीसांनी सांगितले.