हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिलायन्स इंडस्ट्रीची 47 वी सर्वसाधारण सभा (Reliance AGM 2024) आज म्हणजेच २९ ऑगस्टला पार पडली. यावेळी समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी मोठमोठ्या घोषणा केल्या. येत्या दिवाळीपासून कंपनी आपली Jio AI क्लाउड सेवा सुरू करणार असल्याचे अंबानी यांनी जाहीर केलं. या क्लाउड सेवेच्या अंतर्गत Jio वापरकर्त्यांना 100GB मोफत क्लाउड स्टोरेज मिळेल. तसेच मुकेश अंबानी यांनी यावेळी 2G मुक्त भारताचा नारा दिला.
फोटो, व्हिडिओ राहणार सुरक्षित – Reliance AGM 2024
मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी AGM मध्ये सांगितले की, दिवाळीपासून Jio AI Cloud वर वेलकम ऑफर सुरू होणार आहे, ज्या अंतर्गत Jio वापरकर्त्यांना 100GB मोफत क्लाउड स्टोरेज मिळेल. त्याच्या मदतीने प्रत्येक भारतीयाला प्रत्येक उपकरणावर AI सेवा आणि क्लाउड स्टोरेजची सुविधा मिळू शकेल. कंपनीच्या मते, हा एक सुरक्षित प्लॅटफॉर्म आहे. या क्लाउड स्टोरेजमध्ये युजरला त्यांचे फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट्ससह इथर डिजिटल कंटेट सुरक्षित ठेवता येईल.
मुकेश अंबानी यांनी आपल्या भाषणात 2G मुक्त भारताचा नारा दिला. अंबानी यांच्या मते जिओने 50 टक्के वापरकर्ते 3जी शी जोडले आहेत. आज रिलायन्सचा जिओ कंपनी देशाच्या कानाकोपऱ्यात पोचली असून जिओकडे 5G, 6G मध्ये 350 हून अधिक पेटंट आहेत. कंपनीने 5G स्मार्टफोन सर्वसामान्यांपर्यंत नेले आहेत आणि 2 वर्षात Jio चे 13 कोटी ग्राहक 5G शी जोडले गेले आहेत. (Reliance AGM 2024)
मुकेश अंबानी यांनी यावेळी AI वर सुद्धा भाष्य केलं.I प्रत्येक भारतीयापर्यंत AI पोहोचवण्याचे आपले उद्दिष्ट असल्याचे अंबानींनी म्हंटल. मग ते कोणत्याही वर्गातील व्यक्ती असो, एआय आणि त्याची वैशिष्ट्ये प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचवणे हेच अंबानी यांचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे त्यांच्या कंपनीत प्रत्येकजण कनेक्टेड बुद्धिमत्ता वापरण्यास सक्षम असेल, ज्यामध्ये एआय सेवा आणि क्लाउड स्टोरेज इत्यादींचा समावेश आहे. याशिवाय मुकेश अंबानी यांनी एआय डॉक्टर आणि एआय टीचर यांचा समावेश असलेल्या इतर एआय सेवांबद्दलही सांगितले. अनेक लोकांना त्यांच्या मदतीचा फायदा होत आहे, विशेषत: ज्या भागात सेवा सहज पोहोचू शकत नाहीत. अनेक लोक त्यांच्या शिक्षणात एआय टीचरचा फायदा घेत आहेत.