रिलायन्सने अमेरिकन टेक कंपनी Skytran मध्ये 54% हिस्सेदारी खरेदी केली, स्मार्ट मोबिलिटी सोल्यूशनवर करते काम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (IRL) ची सहाय्यक कंपनी रिलायन्स स्ट्रॅटेजिक बिझिनेस व्हेंचर्स लिमिटेड (RSBVL) ने अमेरिकन तंत्रज्ञान कंपनी स्कायट्रन इंक (Skytran Inc) मधील आपली हिस्सेदारी वाढवली आहे. RSBVL ने सांगितले की, स्कायट्रन मध्ये रिलायन्सची हिस्सेदारी 2.67 डॉलर्सच्या नव्या गुंतवणूकीने वाढून 54.46 टक्के झाली आहे. सोप्या भाषेत समजून घ्यायचे तर बहुतेक RSBVL ही स्कायट्रेनचा मोठा भागीदार बनला आहे. यापूर्वी रिलायन्सने ऑक्टोबर 2019 मध्ये स्कायट्रेनमध्ये 12.7 टक्के हिस्सा संपादन केला होता.

स्कायट्रन ही टेक्नॉलॉजी कंपनी आहे जी अमेरिकेमध्ये डेलवेअरच्या कायद्यानुसार 2011 मध्ये सुरू केली गेली होती. जगातील ट्रॅफिक जामची समस्या दूर करण्यासाठी कंपनीने पर्सनल ट्रान्सपोर्टेशन सिस्टम (PTS) लागू करण्यासाठी पॅसिव्ह मॅग्नेटिक लेव्हिटियन अँड प्रोपल्शन टेक्नॉलॉजी तयार केली आहे. स्कायट्रनने स्मार्ट मोबिलिटी सोल्यूशन्स (SMS) तयार करण्यासाठी हे तंत्रज्ञान विकसित केले. कंपनीने प्रस्तावित केलेल्या वाहतूक व्यवस्थेमध्ये कंप्‍यूटरद्वारे नियंत्रित पॅसेंजर पॉड्स असतील. यात अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञान, टेलिकॉम आणि इतर आधुनिक टेक्‍नोलॉजीचा समावेश असेल. यासह, प्रवासी एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी सुरक्षित आणि वेगाने पोहोचतील. तसेच पर्यावरणालाही याचा फायदा होईल.

‘मोठ्या प्रमाणात बदल करणार्‍या तंत्रज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी वचनबद्ध’
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी (Chairman & MD Mukesh Ambani) म्हणाले की,”ही गुंतवणूक भविष्यात तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूकीची आमची वचनबद्धता दर्शवते जे जगात मोठे परिवर्तन आणेल.” ते म्हणाले की,”स्कायट्रनच्या भारत आणि इतर जगाला हाय स्पीड इंट्रा आणि इंटरसिटी कनेक्टिव्हिटीसह हाय स्पीड, अत्यंत कार्यक्षम आणि परवडणारी वाहतूक सेवा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याच्या क्षमतेमुळे आम्ही खूप उत्सुक आहोत.”अमेरिकन टेक कंपनीने रॅपिड ट्रान्सझिट सिस्टीम वर काम केले आहे. तसेच, स्मार्ट मोबिलिटी सोल्यूशन (SMS) भारतासह जगभरात कार्यरत आहे.

‘प्रदूषण कमी केल्याने पर्यावरणालाही थेट फायदा होईल’
रिलायन्सचे अध्यक्ष आणि एमडी मुकेश अंबानी यांनी विश्वास व्यक्त केला की,” या प्रदूषणमुक्त पर्सनल रॅपिड ट्रांसपोर्टेशन सिस्टीम द्वारे वायू आणि ध्वनी प्रदूषणमुक्ती प्रभावीपणे कमी केली जाईल. यामध्ये पर्यायी इंधनांचा वापर केल्यास पर्यावरणालाही फायदा होईल.” रिलायन्स इंडस्ट्रीजसाठी लॉ फर्म कोव्हिंग्टन आणि बर्लिंग एलएलपी (Covington & Burling LLP) ने कायदेशीर सल्लागार म्हणून तर फ्रेशफील्‍ड्स ब्रकहॉज डेरिंगर (Freshfields Bruckhaus Deringer) ने इंटेलेक्‍चुअल प्रॉपर्टी सल्लागार म्हणून काम पाहिले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी आहे. 31 मार्च 2020 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीची एकत्रित उलाढाल 6,59,205 कोटी रुपये आणि कॅश प्रॉफिट 71,446 कोटी रुपये आहे. त्याचबरोबर या कालावधीत कंपनीचा नेट प्रॉफिट 39,880 कोटी रुपये झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment