‘जिओ’कडील ‘फ्री कॉलिंग’चे दिवस गेले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी । आउटगोइंग कॉल मोफत देऊन देशातील दूरसंचार उद्योगातील समीकरणे बदलणाऱ्या ‘रिलायन्स जिओ’ने आता त्यासाठी शुल्क आकारणी करण्याचा निर्णय घेऊन ग्राहकांना धक्का दिला आहे. कॉल टर्मिनेशन शुल्काशी संबंधित नियमांमधील अनिश्चिततेमुळे ‘रिलायन्स जिओ’ आउटगोइंग कॉलसाठी आता ग्राहकांकडून प्रति मिनिट सहा पैसे दराने शुल्कआकारणी करणार आहे. मात्र, आकारलेल्या शुल्काइतकाच डेटा मोफत देऊन त्याची भरपाईही करण्यात येणार असल्याचे कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले.

‘जिओ’तर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार कंपनीच्या ग्राहकांना अन्य ऑपरेटर्सच्या नेटवर्कवर करण्यात येणाऱ्या कॉलसाठी काही रक्कम देणे बंधनकारक असेल, तो पर्यंत प्रति मिनिट ६ पैशांप्रमाणे ग्राहकांकडून शुल्कवसुली करण्यात येणार आहे. मात्र, हे शुल्क ‘जिओ’च्या ग्राहकांनी अन्य ‘जिओ’ यूजरच्या क्रमांकावर केलेले कॉल, व्हॉट्सप आदी प्लॅटफॉर्मचा उपयोग करून करण्यात येणारे फोन आणि लँडलाइन कॉल्स आदींवर लागू होणार नसल्याचेही कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान ‘ट्राय’च्या या भूमिकेमुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी ‘जिओ’ने आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या नेटवर्कवर करण्यात आलेल्या कॉलसाठी प्रति मिनिट सहा पैसे आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रथमच जिओच्या ग्राहकांकडून व्हॉइस कॉलसाठी शुल्क आकारण्यात येणार आहे.

इतर काही बातम्या-

 

 

 

Leave a Comment