Reliance Jio Value Plan : 90 दिवसांपर्यंत नो रिचार्ज ! रोज 2GB डेटा आणि अनलिमिटेड फ्री कॉलिंगची मुभा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Reliance Jio Value Plan : जर तुम्ही रिलायन्स जिओ चे स्बस्क्राइबर आहात आणि रिचार्ज साठी जबरदस्त व्हॅल्यू प्लॅन शोधात असाल तर तुमच्यासाठी ही माहिती परफेक्ट आहे. कंपनीने असा एक प्लान डिझाईन केला आहे जो 250 रुपये पेक्षा कमी किमतीमध्ये दररोज दोन जीबी डेटा आणि कॉलिंग सह SMS बेनिफिट्स ऑफर करतो. चला तर मग जाणून घेऊया या प्लॅन (Reliance Jio Value Plan) बद्दल…

जिओ कडून 90 दिवसांची व्हॅलिडिटी असलेला हा प्लॅन देण्यात आला आहे. ज्याच्यामध्ये डेली डेटा शिवाय जिओ अँप्स चा ऍक्सेस आणि कॉलिंग पासून SMS सुविधा सुद्धा मिळत आहे.

काय आहे प्लॅन ची किंमत?

रिलायन्स जिओ चा हा व्हॅल्यू प्लॅन (Reliance Jio Value Plan) तुम्हाला 749 रुपयात मिळेल. याला 90 दिवसांची व्हॅलिडिटी आहे. अशा तर्हेने प्रत्येक महिन्याचा खर्च 233 रूपये येतो. या प्लॅन च्या बेनिफिट्स बद्दल बोलायचं झालं तर रोज 2GB डेटा हायस्पीड डेटा मिळतो. दररोज 100SMS ची सुविधा मिळते. शिवाय यात jio TV, jio Cinema, Jio cloud अशा अँपचा ऍक्सेस देखील मिळतो.

अनलिमिटेड 5G डेटा(Reliance Jio Value Plan)

रिलायन्स आपल्या युजर्स ना 239 पेक्षा जास्त किंमत असलेल्या प्लॅन्स वर अनलिमिटेड 5G डेटा चा फायदा (Reliance Jio Value Plan) करून देतो. 749 च्या प्लॅन ला सुद्धा हे बेनिफिट मिळतात. मात्र त्यासाठी युजर कडे 5G स्मार्ट फोन आणि 5G काँनेक्टिव्हिटी जरुरी आहे.