कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कोरोनाच्या महामारीने सगळीकडे जनता हैराण झाली आहे. मागील पूर्ण वर्ष कोरोनाशी लढा दिल्यानंतर यावर्षी पुन्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक संकटात जनतेसाठी धावून जाणारी युवक काँग्रेस कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सुद्धा मुकाबला करताना मैदानात दिसत आहे. काँग्रेसचा हा सेवाभाव युवक काँग्रेस संघटन पातळीवर राबविताना दिसत आहे.
सातारा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी युवक काँग्रेसने जी हेल्पलाईन सुरु केली आहे. त्याच्या माध्यमातून अनेक कोरोना रुग्णांना मदत झाली आहे. राज्यात हि हेल्पलाईन प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली काम करीत आहे. तर राज्यात विविध विभाग करून त्या त्या विभागाची जबाबदारी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना दिली गेली आहे. पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर आहे. त्यांच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात, शहरात युवक काँग्रेसची हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यासाठी हि हेल्पलाईन कराड येथे सुरु करण्यात आली आहे. या हेल्पलाइनच्या माध्यमातून २०० वर रुग्णांना बेड उपलब्ध केला गेला आहे .तसेच औषधोपचारासाठी जी मदत रुग्णांना लागेल ती करण्याचा प्रयत्न झाला आहे.
युवक काँग्रेसच्या या हेल्पलाईन मध्ये जयवर्धन देशमुख, आदित्य मोहाळकर, गणेश सातारकर, जितेंद्र यादव, हितेश वायदंडे, विनीत थोरात, निशिकांत मोहिते, ओंकार जाधव, रोहित धर्मे, विशाल भुर्के हे युवक अत्यंत हिरीरीने कार्यरत आहेत. रुग्णांचा फोन आला कि, आपुलकीने माहिती घेत त्या रुग्णाला धीर देत तुमच्यासोबत आम्ही आहोत असा आधार देऊन हेल्पलाईन मधील पूर्ण यंत्रणा त्या रुग्णाच्या मदतीसाठी कार्यरत राहते. या प्रयत्नामुळे रुग्णाला एक आधार मिळतो व याच माध्यमातून युवक काँग्रेसच्या टीमने २०० च्या वर रुग्णांना हॉस्पिटल मध्ये बेड, रुग्णवाहिका, इंजेक्शन, औषधें, प्लाझ्मा अश्या साठी प्रयत्नातून मदत केली आहे. या परिस्थितीत रुग्णांना सामाजिक संस्थांकडून होत असलेली मदत मोलाची ठरत आहे.
युवक काॅंग्रेसची टीम कार्यरत
कोरोना बाधित रुग्णांना तात्काळ उपचार मिळणे, त्यांच्या जेवणाची व्यवस्था, प्लाझ्मा, उपयुक्त औषधे अशी गरज पडेल ती सर्व मदत कोरोना रुग्णाला हवी असते. यासाठी त्याचे नातेवाईक प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असतात. अशातच कोरोना रुग्णांना मदतीसाठी युवक काँग्रेसची टीम कार्यरत आहे.