सांगली जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी दिलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली | जिल्ह्यात कोरोनाने उद्रेक झाला असताना शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी काहीसा मिळाला. चोवीस तासात 1 हजार 720 रुग्ण आढळून आले. तर 46 जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये वाळवा तालुक्यातील सर्वाधिक 11 जणांचा समावेश आहे. याशिवाय 1380 जणांनी कोरोनावर मात केली. सांगली महानगरपालिका क्षेत्रात नवे 186 रुग्ण आढळून आले. तसेच आटपाडी तालुक्यात 114, कडेगाव 104, खानापूर 162, पलूस 103, तासगाव 159, जत 295, कवठेमहांकाळ 114, मिरज 232, शिराळा 67 आणि वाळवा तालुक्यात 184 रुग्ण आढळले.

चालू आठवड्याच्या सुरुवातीला रुग्णसंख्येचे रेकॉर्ड ब्रेक झाले होते. मात्र आठवडा संपत असताना पुन्हा रुग्णसंख्या होत आहे. मागील चोवीस तासात जिल्ह्यातील 6 हजार् 111 रुग्णांची कोरोना चाचणी घेण्यात आली. आरटीपीसीआर चाचण्या 2150 पैकी 729 बाधित तर 4061 अँन्टीजेन चाचणीमध्ये 1071 जण बाधित असल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही चाचण्यामध्ये मिळून 1720 जण पॉझिटिव्ह आढळले. जिल्ह्यातील 46 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सांगली शहर 5 आणि मिरज शहर 3, वाळवा तालुक्यातील 11, जत 7, मिरज 5, कवठेमहांकाळ 4, पलूस व तासगाव तालुक्यातील प्रत्येकी 3, खानापूर व शिराळा तालुक्यातील प्रत्येकी 2 तर आटपाडी तालुक्यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. बाधित रुग्णांपैकी केवळ 1380 जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले. महानगरपालिका क्षेत्रात रुग्णवाढ शनिवारीही स्थिर राहिली. नव्याने 186 रुग्ण आढळून आले. सांगली शहरात 105 तर मिरज शहरात 81 रुग्ण आढळले. याशिवाय आटपाडी तालुक्यात 114, कडेगाव 104, खानापूर 162, पलूस 103, तासगाव 159, जत 295, कवठेमहांकाळ 114, मिरज 232, शिराळा 67 आणि वाळवा तालुक्यात 184 रुग्ण आढळले. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील 40, सोलापूर 9, कर्नाटक 24, सातारा जिल्ह्यातील 6, पुणे येथील एक रुग्ण आढळला. या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. या सर्वांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनाचे 89 हजार 413 रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी 2 हजार 602 व्यक्तींचा मृत्यू झाला असून 69 हजार 783 जण कोरोनामुक्त रुग्ण आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 17 हजार 28 रुग्ण अॅक्टीव्ह असून त्यापैकी 13 हजार 331 बाधित रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरु आहेत.

Leave a Comment