ज्या रेमडिसिवीरसाठी झुंबड… ते ‘मॅजिक बुलेट’ नाही ;पहा औषधबाबतAIIMS च्या डॉक्टरांची महत्वपूर्ण माहिती

नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना रेमडिसिवीर हे औषध कोरोनावर प्रभावी असल्याचे मानले जात आहे. या औषधांचा तुटवडा महाराष्ट्रासह देशभर जाणवत आहे. रेमडीसिवीर औषधाची वाढती मागणी आणि झालेला तुटवडा या औषधाचा काळाबाजार असं बरंच काही बातम्यांमधून पुढे येत आहे. या औषधाची किंमत आता पूर्वीपेक्षा स्वस्तही करण्यात आली आहे. मात्र रेमडीसिविर हे कोरोना रुग्णांवर उपचारासाठी फारसे फायदेशीर नाही. असे AIIMS चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले आहे.

औषधा बाबत बोलताना डॉक्टर रणदिप गुलेरिया म्हणाले की ‘ ‘एक वर्ष आम्ही कोरोना रुग्णांवर उपचारासाठी अनेक औषधांचा वापर करून पाहिला यातून आम्हाला खूप काही समजले रेमडिसिवीर हे औषध ‘मॅजिक बुलेट’ नाही. या औषधामुळे मृत्यूदर कमी होत नाही. लक्षणे नसलेल्या रुग्णांना किंवा सौम्य लक्षण असलेल्या रुग्णांना हे औषध दिल्याने काही फायदा होत नाही. फक्त रुग्णालयात दाखल असलेल्या आणि मध्यम स्वरूपातील लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी हे औषध उपयुक्त आहे. पण हे औषध उशिरा दिल्यानेही काही फायदा होत नाही. या औषधाचा वापर मर्यादितच आहे. प्लाजमा सुद्धा फार उपयोगी नाही. प्लाजमाचाही खूप मर्यादित वापर आहे’ असे गुलेरिया यांनी स्पष्ट केले.

याबाबत बोलताना पुढे गुलेरिया म्हणाले बहुतेक कोरोना रुग्ण हे त्यांच्यातील लक्षणांनुसार केलेल्या उपचारांमुळे बरं होत आहेत. गरज नसताना औषध दिल्याने फायदा होण्यापेक्षा दुष्परिणाम जास्त होईल. असे गुलेरिया यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान रेमडिसिवीरचे उत्पादन घेणाऱ्या प्रमुख कंपन्यांनी या औषधाच्या किमती कमी केल्या आहेत. या औषधाच्या 100 एमजी च्या कुपीची किंमत आता 3500 रुपयांपर्यंत खाली आली आहे प्रत्येक कंपनीच्या औषधाचे दर मात्र वेगळे आहेत.

You might also like