सततची पोटदुखी थांबवण्यासाठी ‘हे’ उपाय निवडा

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आपण काम करतो म्हणजे ते पोटासाठीच करत असतो. लोकांचे आयुष्य हे फार बदलले आहे, धावपळीच्या जीवनामुळे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. जशी प्रगती होत जाते तशी लोकांच्या राहणीमानात बद्धल होत गेला आहे . जीवनात यशस्वी होण्याच्या धडपडीत वेळेवर खाल्ले जात नाही. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. असे कोणते उपाय आहे त्याचा वापर आहारात केल्याने आपले पोटदुखीच्या समस्या या कमी होतात.

— लिंबू

जर पोटाच्या समस्या निर्माण झाल्या असतील तर त्यासाठी लिंबू आणि पाणी याच वापर आहारात घेतला पाहिजे. लिंबाचं सरबत, लोणचं न आवडणारा माणूस विरळच. हे लिंबू पोटदुखीवर अगदी जालीम उपाय आहे.लिंबाचा आहारात वापर करताना लिंबाचे लोणचे तयार करून ते खाल्ले पाहिजे बऱ्याच लोकांना लिंबू खायला आवडत नाही. पित्ताच्या त्रासाने होणारी पोटदुखी कमी करण्यास लिंबू प्रभावी ठरते.

— आलं

आलं हा सुद्धा आपल्या स्वयंपाकघरात कायम असणारा घटक आहे. हे आलं सुद्धा लिंबा एवढचं पोटदुखीवरचा रामबाण उपाय आहे. आल्याचा रस तयार करून किंवा आले हे चहा मध्ये वापरून पिले पाहिजे.

— पुदिना

पुदिना हि शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उपयोगी ठरते. पुदिन्याची वेगवेगळ्या प्रकारची चटणी सुद्धा लोक आवडीने खातात. पुदिना हे आरोग्याच्या दृष्टीने लाभकारक आहे. पुदिना हा पोटदुखीवर सुद्धा लाभकारी आहे. औषधी पदार्थांमध्ये पुदिन्याच्या काढा तयार करून टाकून तो पिला जातो.

— मध

मध हा लाभकारी आहे. मधाचे अनेक आयुर्वेदीक फायदे आहेत. लहान मुलांना मधाचे चाटण दिले जाते. मध हा शुद्ध स्वरूपातला वापरावा. पॉट दुखत असेल त्यावेळी मध पाण्यात टाकून त्याचा वापर रोज सकाळ संध्याकाळ करावे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like