घोरण्याची सवय ठरते धोकादायक!! तुम्हांलाही त्रास असेल तर करा ‘हे’ उपाय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । झोपेत असताना घोरणे ही एक सामान्य समस्या आहे. आपल्या आसपास अनेक जण झोपताना घोरतात. आपण घोरतोय हे त्या व्यक्तीला समजत नाही परंतु त्याच्या जवळ बसलेल्या व्यक्तीची मात्र अशा लोकांच्या घोरण्यामुळे झोप उडते. घोरण्याची अनेक कारणे आहेत. साधारणपणे, कामाचा ताण, जास्तीची धावपळ, थकवा अशी काही घोरण्याची कारणे असू शकतात. परंतु सततचे घोरणेही आरोग्यासाठी काही चांगलं लक्षण नाही. घोरण्याच्या दीर्घकाळात समस्येमुळे मोठे आजार होऊ शकतात. घोरण्यामुळे रक्तदाब वाढतो, त्यामुळे हृदयविकाराचा धोका उद्भवतो. याशिवाय घोरण्यामुळे व्यक्ती अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकते.

एका संशोधनानुसार, भारतातील 20 टक्के लोक नियमितपणे घोरतात. तर 40 टक्के लोक अधूनमधून घोरत असतात. घोरण्याच्या समस्येपासून सुटका करून घेण्यासाठी काहीजण अनेक प्रयत्न करत असतात तसेच काही उपाय आणि युक्त्या वापरत असतात. त्यातच आता भारतीय वंशाचे ब्रिटीश डॉक्टर करण राज यांनी घोरण्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी जिभेचे काही सोपे व्यायाम सांगितले आहेत, त्याबद्दल आपण जाणून घेऊया…

https://www.instagram.com/reel/Cp7tZ9loRct/?utm_source=ig_embed&ig_rid=49d71409-f07b-48ed-a5bf-9af2029af83d

1) तुमची जीभ पाच सेकंदांसाठी बाहेर काढा आणि तशीच ठेवा. घोरणे कमी करण्यासाठी हा व्यायाम तीन ते चार वेळा करा. या व्यायामाचा उद्देश शक्ती सुधारणे आणि स्नायूंना लवचिक बनवणे हा आहे. या व्यायामामुळे स्नायू संतुलित होतील आणि झोपताना ते फडफडणार नाहीत.

2) तुमची जीभ तुमच्या तोंडाच्या आत एका बाजूपासून दुसरीकडे फिरवा. या व्यायामामुळे तुमच्या घशाचे आणि तोंडाचे स्नायू घट्ट होतील, ज्यामुळे तुमची घोरण्याची समस्या दूर होईल

3) तुमची जीभ तोंडाच्या खाली घ्या आणि पाच सेकंद तशीच ठेवा. या व्यायामामुळे तुमच्या घशाच्या मागच्या बाजूचे स्नायू मजबूत होतील.