घर भाड्याने घेताय? जर घर भाड्याने घेणार असाल तर लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | खूप वेळा लोकांना शिक्षण, नोकरी आणि व्यवसाय अशा अनेक कारणांसाठी घरापासून दूर राहावे लागते. अशावेळी काही काळासाठी घर भाड्याने घेणे हा सोयीस्कर पर्याय लोकांच्यासमोर असतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात घर भाड्याने घेतले जातात. योग्य वेळी राहण्यासाठी घर व रूम शोधणे एक आव्हानात्मक काम असते. घर भाड्याने घेताना इतर काही महत्त्वाच्या बाबी पाहणे खुप आवश्यक असते.

तुम्हाला घर भाड्याने घ्यायचे असेल तर, घराची अवस्था, भाड्याची रक्कम, डिपॉझिट रक्कम, एग्रीमेंट घर सोडण्याची नोटीस आणि डिपोजिट परत मिळवण्यासाठी आवश्यकबाबी इत्यादी गोष्टी नीट चर्चा करून मगच ठरवाव्या लागतात. संपूर्ण करार कायदेशीर आणि लेखी असावा. यामध्ये भाड्याची रक्कम आणि डिपॉझिट याबाबत स्पष्ट उल्लेख असावा. भाड्याची रक्कम शिवाय मूलभूत गरजांची पूर्तता जसे, पाणी आणि वीज यांची व्यवस्था कशी आहे. यासाठी अतिरिक्त पैसे तुम्हाला द्यावे लागतील का. याची चौकशी करण्यात यावी. घरात पहिलेच काही फर्निचर किंवा वस्तू असतील तर त्यासाठी वापरताना काय नियम आहेत याची माहिती घेणे गरजेचे आहे.

घर घेताना वार्षिक आणि मासिक खर्च भाडेकरूंनी समजून घेतले पाहिजेत. कारण, नंतर व्यवहारामध्ये तीच एक मोठी समस्या बनते. जर अशा गोष्टी भाडेकरूला आधीपासूनच माहिती असतील तर, अशा समस्या उद्भवणार नाहीत. पहिल्यांदा भाड्याचे घर घेत असतील तर भाडेकरू अशा गोष्टी विचारायचे विसरून जातात. तसेच मालकही बऱ्याचदा सांगायला विसरतात. घर मालक बरेचदा डिपॉझिट म्हणून मोठी रक्कम घेत असतो. यातून रंग आणि इतर खर्च निघत असतो. पण काही वेळा हे रंग आणि इतर गोष्टी न करता डिपॉझिटच्या पैशांमधून काही पैसे वजा करतात. यामुळे बऱ्याच वेळा भाडेकरू आणि मालक यांच्यामुळे वाद होतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment