Renault India : नवीन वर्षात वाढणार गाड्यांची किंमत; Car Loan ही होणार महाग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Renault India : RBI ने डिसेंबरच्या आपल्या पॉलिसी रेपो दरामध्ये 35 बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे. या दरवाढीनंतर आता पॉलिसी रेपो दर 6.25 टक्क्यांवर पोहोचला आहे. ज्यामुळे आता ग्राहकांसाठी कार लोन घेणे महागणार आहे. एकीकडे कर्ज महाग हिट असतानाच आता कार बनवणाऱ्या कंपन्यांकडून कारच्या किंमतीही वाढवल्या जाणार आहेत. आता फ्रेंच कार कंपनी असलेल्या Renault India ने येत्या वर्षांत आपल्या वाहनांच्या किंमतींमध्ये वाढ करणार असल्याचे सांगितले आहे. याबाबत माहिती देताना कंपनीने म्हंटले की,”किंमतीतील वाढीचा परिणाम कमी करण्यासाठी ते आपल्या वाहनांच्या किंमती वाढवणार आहेत.” मात्र, या किंमती किती वाढवल्या जातील याबाबत कंपनीने अद्याप काहीही स्पष्ट केलेले नाही.

Renault Cars Price in India - Renault Models 2022 - Reviews, Specs & Dealers - CarWale

Renault India कडून नुकतेच याबाबतीत एक निवेदन जारी केले गेले आहे. ज्यामध्ये म्हंटले आहे की,” कमोडिटीच्या किंमतींमध्ये सतत वाढ झाल्यामुळे कंपन्यांच्या इनपुट कॉस्ट मध्ये वाढ झाली आहे. त्याचबरोबर, एक्सचेंज रेटमधील चढउतारामुळे महागाई व्यतिरिक्त, कंपनीला नियामकांच्या सक्तीमुळेही वाहनांच्या किंमती वाढवाव्या लागत आहेत.” कंपनीने पुढे सांगितले की,”भारतीय बाजारपेठ आमच्यासाठी खूप महत्वाची आहे. ज्यामुळे येत्या काही दिवसांत, कंपनीकडून भारतीय ग्राहकांसाठी आपल्या उत्पादनांमध्ये आणि सेवांमध्ये अनेक नावीन्य घेऊन येणार आहोत.” हे लक्षात घ्या कि, रेनॉल्ट इंडियाकडून Kiger, Triber आणि Kwid या नावाने भारतात गाड्या विकल्या जातात.

Renault Cars Price in India - Renault Models 2022 - Reviews, Specs & Dealers - CarWale

Renault India च्या आधी Maruti Suzuki ने देखील जानेवारी 2023 पासून वाहनांच्या किंमती वाढवणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र या वाढीव किंमती किती आणि कोणत्या तारखेपासून लागू होतील याबाबत कंपनीने अद्याप काहीही स्पष्ट केलेले नाही. मारुती सुझुकीबरोबरच टाटा मोटर्सकडूनही प्रवासी वाहनांच्या किंमती वाढवण्याविषयीचे संकेत देण्यात आले आहेत.

Renault Kiger review: Compact SUV checks all the boxes

हे लक्षात घ्या कि, भारतात 1 एप्रिल 2023 पासून उत्सर्जनाचे नवीन नियम लागू केले जाणार आहेत. ज्याच्या परिणामी कंपन्यांच्या खर्चातही वाढ होणार आहे. यामुळेच Renault India आणि टाटा मोटर्स सारख्या कंपन्यांकडून आपल्या प्रवासी वाहनांच्या किंमती वाढवण्याची तयारी केली जात आहे. उत्सर्जनाच्या या नवीन नियमांनुसार, आता BS6 स्टेज 2 मानदंडांची पूर्तता न करणाऱ्या वाहनांची विक्री बंद केली जाईल. आता नवीन वाहने पूर्णतः इंधन कार्यक्षम असतील. ज्यामुळे CO2 उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.renault.co.in/

हे पण वाचा :
Business Idea : भरपूर मागणी असलेला ‘हा’ व्यवसाय सुरू करून मिळवा मोठा नफा
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम, अन्यथा येऊ शकेल अडचण
Yes Bank च्या FD वरील व्याजदरात बदल, असे असतील नवीन दर
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात उसळी, आजचे नवीन दर तपासा
Axis Bank देखील FD वर देणार जास्त व्याज, जाणून घ्या नवीन व्याजदर