Loan : वेळेआधीच कर्जाची परतफेड करणे योग्य की अयोग्य? असे करण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

Loan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Loan : पैशांची गरज आपल्यातील प्रत्येकालाच भासते, विशेषतः एखाद्या आणीबाणीच्या प्रसंगी. तसेच नवीन घर घेताना किंवा आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी कधी कधी जास्त पैसे उभारण्याची आवश्यकता असते, अशा वेळी बँकेचे कर्ज घेतले जाते. मात्र त्याची परतफेड करण्यासाठी EMI रूपात पैसे देखील भरावे लागतात. यासोबतच आपल्याला भरपूर व्याजही द्यावे लागते. मात्र जर कर्जाची मुदत संपण्याआधीच ते निर्धारित कालावधीआधीच परत करता येऊ शकेल. याला लोन फोर-क्लोजिंग असे म्हंटले जाते. मात्र, असे करत असताना काही गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे. कारण असे करण्याचे काही फायदे आणि तोटेही आहेत. चला तर मग त्याविषयीची माहिती जाणून घेउयात…

How do I take out a loan? - Aintree Group

लोन फोर-क्लोजिंगचे फायदे जाणून घ्या

हे लक्षात घ्या कि, वेळेआधीच पैसे भरण्याने कर्जावर द्यावे लागणारे व्याज वाचवता येते. तसेच जर आपण एकापेक्षा जास्त कर्ज घेतले असेल तर यामधील ज्याचा व्याजदर जास्त असेल त्या कर्जाची परतफेड आधी करता येईल. अशाप्रकारे, पर्सनल लोन, कार किंवा बाईक लोन, क्रेडिट कार्डचे ईएमआय इत्यादी एक एक करून परत करता येईल. याशिवाय आपल्याकडे लोन ट्रान्सफर करण्याचा पर्याय देखील उपलब्ध असेल. अशावेळी जास्त व्याजदर असलेले आपले कर्ज कमी व्याजदर असलेल्या बँकेमध्ये ट्रान्सफर करता येईल. Loan

How to Navigate the Mortgage Loan Closing Process - NerdWallet

लोन फोर-क्लोजिंगसाठी आकारले जाईल शुल्क

लोन फोर-क्लोजिंगसाठी अनेक बँकांकडून शुल्क देखील आकारले जाते. जर आपल्यालाही एखादे कर्ज लवकर बंद करायचे असेल तर त्यासाठी बँकेत जाऊन त्याबाबत विचारणा करावी लागेल. यासाठी अनेक बँकांकडून उर्वरित कर्जाच्या रकमेच्या 1 ते 5 टक्के रक्कम आकारली जाईल. बँकांना होत असलेल्या व्याजावरील नुकसानीच्या भरपाईसाठी असे केले जाते. फोर-क्लोजिंग चार्ज आणि उर्वरित ईएमआयवरील व्याज या दोन्हीचे कॅल्क्युलेशन करून आपल्याला कर्जाची परतफेड करायची की नाही याबाबत निर्णय घेता येईल. Loan

What You Need to Know Before Taking Out a Commercial Loan - Texas Security  Bank

हे सर्टिफिकेट घेणे महत्वाचे ठरेल

ग्राहकांना कुठलेही लोन फोर-क्लोजिंग केल्यानंतर त्याचे एनओसी सर्टिफिकेट घ्यावे लागेल. हे कर्जाची परतफेड केल्याचा पुरावा असेल. याशिवाय, होम लोन किंवा मालमत्तेशी संबंधित सर्व बाबींच्या ट्रान्सझॅक्शनच्या डिटेल्ससाठी NEC म्हणजेच नॉन-कॅम्ब्रन्स सर्टिफिकेटही घ्यावे लागेल. याशिवाय कर्ज भरल्यानंतर, आपला सिबिल स्कोअर वेळेवर अपडेट झाला आहे याकडेही लक्ष द्यावे लागेल. कारण या प्रक्रियेसाठी बराच वेळ लागत असल्याने याचा आपल्या परिणाम CIBIL स्कोअरवर देखील होण्याची शक्यता आहे. Loan

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://sbi.co.in/web/personal-banking/loans/personal-loans

हे पण वाचा :
Mahindra Thar वर मिळवा 40,000 पर्यंतची सूट, ‘या’ वाहनांवरही सवलत उपलब्ध
Smartphone च्या स्पीकरमध्ये साचली आहे घाण, ‘या’ 3 Tricks वापरून करा साफ
Royal Enfield ची इलेक्ट्रिक मोटरसायकल लवकरच होणार लाँच; पहा लूक
Credit Card : Phonepe, Google Pay वर क्रेडीट कार्ड सारखी सुविधा; पैसे नसले तरी खर्च करता येणार..
Forbes Richest Women : ‘या’ आहेत भारतातील पहिल्या 5 सर्वात श्रीमंत महिला, अब्जावधींमध्ये आहे संपत्ती