नवी दिल्ली : देशात लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण मोहीम ठप्प होते की काय अशी परिस्थिती आहे. अनेक राज्यांमध्ये लसीकरणाचे बुथ बंद करण्यात आले आहेत मात्र. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी (9एप्रिल ) राज्यांना पुरवलेल्या लसीकरणाच्या तुटवड्याबद्दलचे अहवाल चुकीचे असल्याचे म्हंटले आहे. तसेच सर्व राज्यांना पुरेसे लसीचे डोस उपलब्ध करून दिली आहेत. असे देखील अमित शहा यांनी सांगितले आहे.
लसीकरणाबाबत पत्रकारांशी बोलताना अमित शहा म्हणाले,’ लसीकरणाच्या तुटवड्याची बातमी चुकीची आहे. सर्वच राज्यांना लसीकरणाचा योग्य पुरवठा करण्यात आलेला आहे. गृहमंत्री अमित शहा सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत.
Reports on vaccine shortage incorrect; all states provided adequate doses: Amit Shah
Read @ANI Story | https://t.co/WMrGaxB1iJ pic.twitter.com/g65cLkL15i
— ANI Digital (@ani_digital) April 9, 2021
दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी गुरुवारी राज्यांना किती प्रमाणात लसीकरण दिले गेलेले आहेत याची आकडेवारी जाहीर केली. मात्र महाराष्ट्रासह इतर अनेक राज्यांना लसींचा तुटवडा जाणवू लागला त्यामुळे आता लसीकरणाची मोहीम ठप्प करावे लागते की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रासह,दिल्ली,तेलंगणा आंध्र प्रदेश, ओडिसा,छत्तीसगढ या राज्यात देखील लसीचा तुटवाडा निर्माण झाल्याने मोहीम थांबण्याची शक्यता निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.
ओडीशात 700 लसीकरण केंद्र बंद
कोरोनाच्या लसीच्या कमतरतेमुळे ओडिसा मधील 1400 पैकी 700 लसीकरण केंद्रे बंद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्यात केवळ दोनच दिवस पुरेल एवढा लसींचा साठा शिल्लक असल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्यातील करोना लसींचा साठा ठप्प होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे लसीकरण बंद होईल की काय अशी भीती आरोग्यमंत्री नब किशोर दास यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रात लसीवरून राजकारण तापलं
केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी लसीकरणा वरून महाराष्ट्र राज्याला फटकारलं. त्यानंतर मात्र राज्यातील अनेक नेत्यांनी केंद्र लसीकरणाच्या बाबतीत दुजाभाव करत असल्याची टीका केली आहे. राज्यात केवळ साडेसात लाख लसींचा पुरवठा केला आहे. मात्र इतर राज्यांना चाळीस लाखांहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत. यात राजकारणाचा मुद्दा नाही पण ज्या पद्धतीने पुरवठा केला जात आहे ते योग्य नाही. दर आठवड्याला आम्हाला 40 लाख डोस द्या त्यापेक्षा आधीक आमची काहीच मागणी नाही असे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हंटले आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page
Click Here to Join Our WhatsApp Group