मुंबई । अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयानं त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आता अर्णव गोस्वामी यांच्या पत्नीलाही अटक होण्याची शक्यता आहे. आज मुंबई पोलिसांकडून अर्णव गोस्वामींच्या पत्नीला कधीही अटक होऊ शकते.
रायगड पोलीस काल अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. त्यावेळी अर्णव गोस्वामी यांच्यासह त्यांच्या पत्नीने रायगड पोलिसांच्या कारवाईला विरोध करून त्यांना धक्काबुक्की केली होती. त्याविरोधात रायगड पोलिसांच्या पोलीस निरीक्षक सुजाता तानावडे यांच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यावरूनच त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी काल अर्णव गोस्वामीला अटक केल्यानंतर त्याला मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यासमोर हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा अलिबाग पोलिसांनी सेशन कोर्टात धाव घेऊन अर्णवच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे. त्यावर आज किंवा उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे अर्णवच्या वकिलांनी त्याच्या जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेण्याच्या हालचाली सुरू केल्याचं सूत्रांनी सांगितलं. (Arnav Goswami’s Wife Likely To Be Arrested)
अर्णब गोस्वामींचं भाजपासोबतचं 'फॅमिली कनेक्शन' नेमकं आहे तरी काय?
वाचा सविस्तर-👉 https://t.co/q2ihKMoggP@arnabofficial9 @BJP4Maharashtra #BJP #ArnabGoswami #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 5, 2020
लॉकडाऊनमध्येही EMI भरणाऱ्यांसाठी गुड न्यूज! बँकांकडून खात्यात पैसे होतायत जमा, लगेच करा चेक
वाचा सविस्तर-👉 https://t.co/ZeSn7yF7GH#emi #lockdown #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 5, 2020
कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in