अखेर नदीत कोसळलेली कार सापडली ; दोघांना वाचवण्यासाठी ITBPकडून शर्थीचे प्रयत्न सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काल हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथील चंदीगड-मनाली राष्ट्रीय महामार्गावरील बाबेलीजवळ एक अल्टो कार बियास नदीत कोसळली होती. या अपघातात दोन जण वाहून गेल्याचे समजत होते. या कारचा शोध घेतला पण ती सापडत नव्हती. अखेर आज ITBP (ITBP) तुकडी – 2 बटालियनच्या जवानांनी (ITBP) ही कार शोधून काढली असून या कारमधील लोकांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. बियास नदीचा प्रवाह जोरदार वाहत असतानाही या कारचा शोध घेऊन बचाव कार्य चालू आहे.

नदीत एका ढिगाऱ्यावर अडकलेल्या कारपर्यंत पोहोचण्यात लष्कराला (ITBP) यश आले आहे. 6 जुलै रोजी हनुमान मंदिर एनएच-3, चंदीगड मनाली हायवेजवळ 3 प्रवाशांसह कार नदीत पडली होती. याआधी बचावलेल्या चालकाला कुल्लू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथील चंदीगड-मनाली राष्ट्रीय महामार्गावरील बाबेलीजवळ बुधवारी हा अपघात झाला होता.

सविस्तर माहिती अशी कि, कुल्लू जिल्ह्यातील सुहानी पूल शिरध येथे राहणारा चालक अरुण बहादूर अल्टो कारमधून प्रवाशांसह हमीरपूरहून मनालीकडे जात होता. त्यावेळी कारचे नियंत्रण सुटून कार बाबेलीजवळील बियास नदीत पडली. चालक अरुण कसाबसा बाहेर पडण्यात यशस्वी झाला, मात्र, गाडीसह 2 प्रवासी नदीत वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल (ITBP) झाले आणि त्यांनी बचावकार्याला सुरुवात केली. नदीत वाहून गेलेल्या तरुणाचे नाव अमन असून तो सुंदरनगरचा रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. त्याचवेळी दुसरा व्यक्ती केवल सिंग गाव द्रांग तहसील पधार जिल्हा मंडी येथील रहिवासी असून मनाली येथील एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. या दोघांनाही वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

हे पण वाचा :
“देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाहीत, मला माहिती होतं”, अमृता फडणवीस यांचे मोठे विधान

आमदार शहाजी बापू पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत धरला ठेका, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाला दुसरा धक्का, ‘या’ चुकीमुळे पाकिस्तानला झाला फायदा

खरे खंडणी बहाद्दर राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे : आ. महेश शिंदे

नांदेडमध्ये खंडणीप्रकरणी काँग्रेस नगरसेवकाच्या मुलाला अटक, तर शिवसेनेचा माजी नगरसेवक फरार

Leave a Comment