शिक्षणात बौद्ध , दलितांचे प्रमाण वाढत आहे, परंतु उच्चशिक्षिणात प्रमाण कमी
कोल्हापूर प्रतिनिधी
२०१२ च्या आकडेवारी नुसार अनुसुचित जातीत अजूनही गरीबी आहे. शिक्षणात बौद्ध ,दलितांचे प्रमाण वाढत आहे, परंतु उच्चशिक्षिणात प्रमाण कमी आहे. इतर महिलांच्या तुलनेत दलित महिलांमध्ये मागसलेपणा आहे, त्याच्यावर कुठेही चर्चा होताना दिसत नाही.
बौद्ध , दलित वंचित समाजाची स्थिती गंभीर आहे, असे मत पद्यश्री डॉ. सुखदेव थोरात यांनी व्यक्त केले. ते माणगाव परिषद शताब्दी महोत्सव समिती आयोजित शताब्दी व्याख्यानमालेत शाहू स्मारक भवन येथे बोलत होते.येत्या २०१९- २०२० ला माणगाव परिषदेला १०० वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केला होता.
शिक्षणाचं खाजगीकरण करून बौद्ध , दलित, वंचितांचे शिक्षण संपविण्याचे काम सुरु आहे.आरक्षण फक्त शासकीय नोकऱ्यात आहे, त्यामध्येही कंत्राटीकरण करून आरक्षण संपविण्याचा प्रयत्न चालू आहे, असे थोरात म्हणाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. विनय कांबळे होते. प्रास्ताविक राहुल ठाणेकर यांनी केले, तर स्वागत अशोक चोकाककर यांनी केले.