रिझर्व्ह बँकेचा आर्थिक आढावा, Omicron शी संबंधित घडामोडी ठरवतील शेअर बाजारांची दिशा

नवी दिल्ली । Omicron या कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरिएंटच्या अनिश्चिततेच्या दरम्यान या आठवड्यात शेअर बाजारातील अस्थिरता कायम राहण्याची अपेक्षा आहे. याशिवाय आठवडाभरात रिझव्‍‌र्ह बँकेची पतधोरण आढावा बैठकही होणार असून त्यात प्रामुख्याने शेअर बाजारांना दिशा मिळेल. असे मत विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. हा आठवडा मोठ्या घडामोडींचा असेल, असे विश्लेषकांनी सांगितले. आर्थिक पुनरावलोकनाव्यतिरिक्त, अनेक आर्थिक डेटा देखील आठवड्यात येणार आहेत.

स्वास्तिका इन्व्हेस्टमार्टचे रिसर्च प्रमुख संतोष मीना म्हणाले, “Omicron , आरबीआयचा चलनविषयक आढावा आणि मॅक्रो इकॉनॉमिक डेटा यावरील अनिश्चिततेमुळे बाजार अस्थिर राहण्याची शक्यता आहे. Omicron बद्दल अनेक बातम्या येत आहेत, ज्यामुळे बाजारात अनिश्चितता निर्माण होत आहे. देशांतर्गत आघाडीवर, आर्थिक आढावा बैठक महत्त्वाची असेल. सेंट्रल बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) बैठकीचा निकाल 10 डिसेंबरला लागणार आहे.

‘या’ आठवड्यात IIPआणि महागाईची आकडेवारी
मीना म्हणाले, “औद्योगिक उत्पादन (IIP) आणि महागाईची आकडेवारी या आठवड्यात येणार आहे. मात्र, शुक्रवारी बाजार बंद झाल्यानंतर ही आकडेवारी जाहीर केली जाईल.”

रेलिगेअर ब्रोकिंगचे रिसर्चचे उपाध्यक्ष अजित मिश्रा म्हणाले, “आम्हाला या आठवड्यात बाजार खूप अस्थिर असेल अशी अपेक्षा आहे. या आठवड्यातअनेक महत्त्वाचे आर्थिक आकडे येणार आहेत. बाजारातील सहभागी रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक आढाव्यावर लक्ष ठेवतील. मॅक्रो-इकॉनॉमिक आघाडीवर, IIP आणि महागाईचा डेटा 10 डिसेंबर रोजी येणार आहे.”

अस्थिरता अंदाज
सॅमको सिक्युरिटीजच्या इक्विटी रिसर्चच्या प्रमुख येशा शाह यांनी सांगितले की,”अनेक आर्थिक डेटा आणि घडामोडींमुळे बाजारातील सहभागींनी या आठवड्यात अस्थिरतेसाठी तयार राहावे. बाजारातील प्लेयर RBI च्या आर्थिक आढाव्याच्या परिणामातून गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करतील. गेल्या आठवड्यात बीएसईचा 30 शेअर्स असलेला सेन्सेक्स 589.31 अंकांनी किंवा 1.03 टक्क्यांनी वर होता.”

या आठवड्यात चलनविषयक धोरण समितीची बैठक
जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले, “रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक या आठवड्यात होणार आहे. आगामी काळात बाजारासाठी हे एक प्रमुख उत्प्रेरक असेल. या व्हायरसच्या नवीन व्हेरिएंटच्या दरम्यान गुंतवणूकदार चलन धोरण समितीच्या (MPC) बैठकीच्या निकालांची वाट पाहत आहेत.” “या आठवड्यात नोव्हेंबरमधील महागाईची आकडेवारी आणि ऑक्टोबरमधील औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी समोर येईल,”असे ते म्हणाले.

You might also like