हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना दुसरीकडे राज्य मागासवर्ग आयोगाचे राजीनामा सत्र सुरूच असल्याचे दिसत आहे. सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होणे सर्वांनाच अपेक्षित होते. मात्र या चर्चेपूर्वीच महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांनी मागासवर्ग आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता आयोग बरखास्त होण्याच्या चर्चांना देखील तितकाच जोर आला आहे.
आनंद निरगुडे यांनी आयोगाचा राजीनामा देण्यापूर्वी म्हटले आहे की, शासकीय हस्तक्षेपामुळे त्रस्त होऊन आपण हा राजीनामा देत आहे. त्यांचा हा राजीनामा मुख्य सचिव यांनी स्वीकृत केला केला. याबाबतची माहिती OBC मंत्रालयातील अवर सचिव नरेंद्र आहेर यांनी पत्रकान्वये राज्य मागासवर्ग आयोगाच्या कार्यालयास कळवली आहे. यापूर्वी राज्य मागासवर्ग आयोगाचे दोन सदस्य बालाजी सगर किल्लारीकर आणि लक्ष्मण हाके यांनी देखील आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता थेट अध्यक्षांनीच राजनामा दिल्यामुळे आयोग बरखास्त करण्यात येईल का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अद्याप क्युरेटीव्ह पेटीशनवरील सुनावणी देखील प्रलंबित आहे. मात्र त्याचा निकाल येण्यापूर्वीच राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी हा राजीनामा देताना दोन मंत्र्याच्या मंत्र्यांचा हस्तक्षेपाचे कारण सांगितले आहे. मुख्य म्हणजे, आयोगाच्या मदतीने राज्य सरकारला काही माहिती मिळणे अपेक्षित होते, ज्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देताना या बाबी विचारात घेण्यात येणार होत्या. मात्र आता आयोगात राजीनामा सदर सुरू झाल्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा आणखीन पुढे खोळंबण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.