भारतीय जनता पार्टीबद्दल आम्हांला आदर, आमचा आरोप पावसकर गटावर : राजेंद्रसिंह यादव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

भारतीय जनता पार्टी बद्दल आम्हांला आदर आहे. आमचे आरो हे पावसकर गटावर आहेत. आमची आघाडी सक्षम आणि पक्षविरहित आहे. आमची स्थानिक आघाडी आहे. तुमची भाजपाच्या चिन्हावर पक्षीय स्वरूपाची आघाडी आहे. तुम्ही ज्या दोन नगरसेवकांचा पाठिंबा घेतला ते काॅंग्रेसचे सदस्य आहेत. त्या दोन सदस्यावर सत्ता येणार होती. तो पाठिंबा पावसकर गटाने केवळ स्थायी समितीत जाण्यासाठी घेतला. भाजपा पक्षाला मिळालेले स्विकृत नगरसेवक पद अपक्ष नगरसेवकांना का द्यावे लागले. त्यामुळे पावसकरांचे राजकारण काँग्रेसच्या कुबड्यावर चालू आहे. तेव्हा बहुमताचे बघताना आपलं ठेवायचं झाकून अन् दुसऱ्याचं बघायचं वाकून अशी टीका जनशक्तीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव यांनी जेष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांच्यावर केली.

कराड नगरपालिकेत जनशक्ती आघाडीच्या आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, बांधकाम सभापती हणमंतराव पवार, महिला व बाधकाम सभापती स्मिता हुलवान, नगरसेविका प्रियांका यादव, अोकार मुळे, राहूल खराटे, निशान ढेकळे आदी उपस्थित होते.

राजेंद्रसिंह यादव म्हणाले, पालिकेचे 134 कोटींचे बजेट स्थायी समितीत मंजूर झालं होतं. जनरल मिटींगमध्ये आले ते वेगळे होत. स्थायीमध्ये कोणतेही वाढ नसताना, वाढ कशी झाली. सभेत आमच्याकडे आलेल्या प्रती चुकीच्या होत्या. बजेट मधील कागदपत्रे गहाळ झालेली आहेत. सभागृहात बोललं जातं मांडलं जातं ते गहाळ होतं आहे. आम्ही विरोध केला नसता तर दरवाढीचे बजेट मंजूर झाले असते. जनशक्ती आघाडीने उपसूचनेद्वारे मांडलेले 270 कोटींचे बजेट मंजूर झाले, हा आमचा नैतिक विजय आहे. स्मार्ट सिटीचे बनवण्याचे स्वप्न आम्ही पाहिले असून ते पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. परिपूर्ण उपसूचना मंजूर करत आहोत असेही म्हटले होते.

काजू कथलीचे कारले कसे झाले ?

मुख्याधिकारी यशवंत डांगे यांची बदली झाल्यानंतर पालिकेत काहींनी काजू कथली वाटून आनंद व्यक्त करत मुख्याधिकारी रमाकांत डाके यांचे स्वागत करण्यात आले. तेच रमाकांत डाके त्यांना आता वाईट कसे झाले. काजू कथलीचे कारले कसे झाले? डांगे, डाके हे चुकीचे आणि एकच माणूस सतत बरोबर कसा असू शकतो, असा युक्तिवादही राजेंद्रसिंह यादव यांनी केला.

मला स्वच्छतेची काळजी, बिलांचा फॉलोअप घेणारच : विजय वाटेगावकर

स्वच्छता, स्वच्छ सर्वेक्षणमध्ये मी भरपूर काम केले असून यात मला मोठा आनंद मिळतो. स्वच्छतेशी निगडीत कामांच्या बिलांना विलंब झाला तर त्याचा फॉलोअप मी घेणारच, असे आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांनी पावसकरांच्या आरोपांना उत्तर देताना सांगितले.

Leave a Comment