हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या राज्यांमध्ये लोकसभा निवडणुका (Loksabah Election) सुरू आहेत. यात राजकीय पक्षांनी प्रचार सभांचा धडाका लावला आहे. आता येत्या सोमवारी पुण्यामध्ये महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) सभा होणार आहे. त्यामुळे पुणे शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. तसेच पुणे शहरात अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. हे निर्बंध नेमके कोणते आहेत आणि या निर्बंधांचे पालन न केल्यास कोणते कारवाई केली जाऊ शकते हे जाणून घ्या.
निर्बंध कोणते लागू?
येत्या 29 ते 30 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरच पुणे शहरात अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. या निर्बंधात पुणे शहर परिसरात अवकाश उड्डाणावर बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या देशानुसार, 27 एप्रिल रोजी 12 वाजल्यापासून ते 30 एप्रिलरोजी 12 वाजेपर्यंत पुणे शहर परिसरात पॅराग्लायडिंग, हॉट बलून सफारी, ड्रोन, मायक्रोलाइट एअरप्लेन इत्यादींना बंदी घालण्यात आली आहे.
तसेच या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवून शहरातील हॉटेल, लॉज तसेच गुन्हेगारांची तपासणी केली आहे. आता पोलीस पुणे शहरातील लॉजमध्ये संशयास्पदरीत्या राहणाऱ्या नागरिकांची चौकशी करत आहेत.