क्रूरतेचा कळस !! रिटायर्ड पोलिस अधिकाऱ्याने कुत्र्याच्या अंगावरून घातली चारचाकी गाडी ; व्हिडिओ होतोय व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काही लोक मनाने फार निष्ठूर असतात. त्यांना फक्त आपल्या मनाप्रमाणे जग चालावे असे वाटत असते. या पृथ्वीवरती फक्त त्यांचा हक्क आहे असे ते वागत असतात. प्राण्यांना माणसाप्रमाणे जगण्याचा अधिकार नसतो असे त्यांना वाटते. अशीच हृदयाचा थरकाप उडवणारी घटना बंगलोरमध्ये घडली आहे. बेंगलोर येथील हुलिमाऊ येथे एका सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याने रस्त्यावर झोपलेल्या कुत्र्यावर चार चाकी चढवली. कुत्रे गंभीररीत्या जखमी झाले असून मृत्यूशी संघर्ष करत आहे.

होलीमाऊ, बेंगलोर येथील 65 वर्षीय नागेशय्या हे बेंगलोर पोलीसमधून पोलीस उपनिरीक्षक या पदावर सेवानिवृत्त झाले. त्यांनी त्यांच्या घरा पुढे झोपलेल्या कुत्र्याला गाडीचा हॉर्न वाजवून उठण्याचा प्रयत्न केला. पण ते कुत्रे उठले नाही. याचा राग धरून त्यांनी आपली गाडी कुत्र्याच्या अंगावरून घातली. दोन्ही चाक कुत्र्याचा अंगावर गेल्यानंतर ते तसेच पुढे निघून गेले.

रस्त्यावरील सीसीटीव्हीमध्ये सर्व प्रसंग कैद झाला असून, व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. प्राणीप्रेमी सर्व स्तरांमधून नागेशय्या यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. नागेशय्या यांच्यावर होलीमाऊ पोलीस स्टेशन मध्ये क्रूएल्टी ऑन ऍनिमल ॲक्ट आणि सेक्शन IPC 429 नुसार गुन्ह्याची नोंद केली आहे. जखमी कुत्र्याला बोझो वॉग्ज LLP वेटरनरी हॉस्पिटल मध्ये भरती केले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’