दिलासादायक ! 7000 नाही 1200 रुपयात मिळणार ब्लॅक फंगसचं इंजेक्शन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली वृत्तसंस्था: संपूर्ण देशामध्ये कोरोना बरोबरच ब्लॅक फंगस म्हणजेच काळी बुरशी या आजारानं आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. मात्र केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी ब्लॅक फंगस वरील उपचाराबाबत आता एक चांगली बातमी दिली आहे. ब्लॅक फंगसवर उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधाची किंमत 7000 रुपयांवरून अवघ्या बाराशे रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. नितीन गडकरी यांनी एम्फोटेरिसिन बी इमल्शन हे इंजेक्शन लॉन्च केले आहे. देशात या इंजेक्शनचे उत्पादन आतापर्यंत एकच कंपनी करत होती मात्र आता वर्ध्याची जेनटेक लाइफ सायन्स कडून देखील हे इंजेक्शन तयार करण्यात येणार आहे. कंपनीकदे दररोज तब्बल 20 हजार वायल उत्पादन करण्याची क्षमता आहे. त्यामुळे या रोगावर उपचार घेणाऱ्या रुग्णांना नक्कीच दिलासा मिळणार आहे. येत्या सोमवार पासून त्याचे वितरण सुरु होणार आहे.

झायडस कॅडिला (Zydus Cadila) आणि टीएलसी (TLC)कडून औषध निर्मिती

या औषधांचं उत्पादन वाढविण्यासाठी भारत सरकारने पाच आणखी कंपन्यांना या औषधाच्या निर्मितीसाठी परवाना उपलब्ध करुन दिला आहे. दरम्यान झायडस कॅडिला आणि टीएलसी या तैवानच्या औषधनिर्मिती कंपनीने दिलासादायक घोषणा केली आहे. Liposomal Amphotericin B हे औषध ब्लॅक फंगस अर्थात म्‍यूकरमायकोसिसच्या  उपचारांसाठी वापरलं जातं. त्याची भारतात विक्री करण्यासंदर्भातल्या करारावर या दोन्ही कंपन्यांनी स्वाक्षरी केली असल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली.

दिल्ली उच्च न्यायालय हे केंद्राकडून निर्णय येईपर्यंत काळ्या बुरशीच्या रुग्णांवरील उपचारासाठी आयातकांद्वारे करार पत्रावर एम्फोटेरिसिन बीवर कररहित आयात करण्याची परवानगी दिली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने सांगितलं की, लोकांचा जीव वाचविण्यासाठी काळ्या बुरशीवरील औषधांची गरज आहे.

 

Leave a Comment